आपला जिल्हा आपली बातमी

शाळेतील शिपाई असलेला तो शाळेतील प्राचार्य झाला कसा.

खोटे बनावटी कागदपत्रे करून केला मोठा घोळ,प्राचार्य पदाच्या आडून केला लाखोचा भ्रष्टाचार.

सीमा रणदिवे याच्या फेसबुक पोस्ट वरून शाळेतील शिपाई असलेला तो शाळेतील प्राचार्य झाला कसा.

   सगळ्यांना मानाचा आणि क्रांतिकारी जय भिम.. 

खरंतर मी लाईव्ह करणार होती पण काही आपले भाऊ-बहिणी घाईत असतात त्यामुळे ते लाईव्ह पूर्ण ऐकत नाहीत.. म्हणून लिहून पाठवले आहे.. सगळ्यांनी नक्की वाचा.. आणि शेअर करा… मला कुठल्याही पक्षाशी काही देणं घेणं नाही.. मी एक समाजातील महिला आहे आणि समाजसेविका आहे.. म्हणून ही पोस्ट मला करावी लागली.. 

काही दिवसांपूर्वी माझ्याकडे काही महिलांनी आणि पुरुषांनी धाव घेऊन महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली.. तोच मुद्दा आज मी तुमच्यासमोर मांडत आहे.. तर विषय असा आहे की, सीबीडी बेलापूर सेक्टर1 या शाळेतील इंग्लिश मीडियमचे प्राचार्य बी बी पवार यांच्या बद्दल.. हा व्यक्ती आधी या शाळेमध्ये शिपाई म्हणून काम करत होता.. आणि काही काळानंतर याने पैसे देऊन शिक्षणाच्या डिग्रीज विकत घेतल्या, त्यानंतर हा व्यक्ती आपले केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांना भेटून पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या प्राचार्य पदाची मागणी केली.. आणि त्याने त्याच्या खोट्या डिग्री दाखवल्या.. आठवले साहेबांना वाटलं की, हा व्यक्ती बुद्धिस्ट आहे.. आपल्या समाजाचा आहे.. म्हणून याला त्यांनी प्राचार्य पदावर बसवलं.. घरात चहाचा कप सुध्दा तुटलेला असून शिपाई असणारा व्यक्तीला आठवले साहेबांनी प्राचार्य केले.. कारण की, बाबासाहेबांच्या स्वप्नातील शाळा आपला माणूस योग्य पद्धतीने त्या शाळेला काम करेल.. पण हा व्यक्ती प्राचार्य झाला तर खरा परंतु त्या पदाचा याने गैरवापर सुरू केला.. 

 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे नवी मुंबईतील बेलापुरच्या शाळेत रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली बी.बी. पवार नामक इसमाची प्राचार्य म्हणून याची हकालपट्टी झाली आहे.. परंतु याने गेल्या 10 वर्षांपासून 4 करोड रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे.. ही गोष्ट संस्थेचे अध्यक्ष रामदास आठवले साहेब यांना माहिती पडल्यामुळे त्याची हकालपट्टी केली… बी. बी पवार यांनी त्या शाळेत महिला शिक्षकांचा विनयभंग केला आहे… संस्थेची सेक्टर -8 डीएड कॉलेज, शाळेतील वर्ग भाड्याने देऊन 4 लाख महिना संस्थेला न माहिती होता स्वतःचे घर आजही भरत आहे.. त्याचा भाऊ मोहन पवार 2 री बायको शाळेच्या टेरेसवर घर बांधून राहत आहे… संस्था स्वतःची प्रॉपर्टी असल्यासारखे राहत आहे.. हे निदर्शनास आल्यावर यांची हकालपट्टी झाली असून सुद्धा हे लोक घुसखोरी करत आहेत.. त्याच्यावर कारवाई झाली आहे….

 

हा महिलांशी तेथील शिक्षक वर्गातील महिलांशी अश्लीश भाषेत बोलतो.. जशी सगळी मालमत्ता स्वतःची आहे या गर्वाने भाषा करतो , केबिनमध्ये बोलवून त्यांना खालच्या लेवलला बोलणे, याचा पुरावा मी स्वतः आहे.. कारण त्या शाळेत मी चार वर्षांपूर्वी शिक्षिका होती.. त्या शाळेमध्ये प्रियंका नावाची एक शिक्षिका होती तिच्याही कॅरेक्टरवर याने बोट उचलला.. त्यानंतर सहा महिन्यापूर्वी विकास खंडारे नावाचे शिक्षक होते.. त्यांनाही याने मारहाण केली.. इंग्लिश मीडियमचा प्रिन्सिपल असून याला इंग्लिश बोलता येत नाही.. इंग्रजी शब्दाचा ABCD सुद्धा याला माहित नाही.. आणि असा व्यक्ती डीएड कॉलेजचा आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा प्राचार्य होऊन बसलाय.. समाज काय बघतोय, तुम्ही आठवले साहेबांच्या बाजूने नाही.. पण बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही खूप मेहनतीने उभी केली आहे.. त्या सोसायटीतील, त्या शाळेतील, त्या टीचर महिला वर्गासाठी, त्या शाळेतील मुलांसाठी पुढे यावं त्यांना याच्या अत्याचारातून वाचवण्यासाठी पुढे यावं..आणि तेथील हे गैरवर्तन थांबवण्याचे काम समाजाने केले पाहिजे.. आणि म्हणून मी एक समाजसेविका म्हणून ही पोस्ट टाकत आहे.. 

 

या व्यक्तीने शाळेत असलेले तेथील रूम मंडपवाल्यांना 50 /50 हजाराला भाड्याने दिले… त्यानंतर शाळेतील परिसरात आवारात जे झाडं आहेत, ते नारळाचे झाड सुद्धा नारळ तोडून सगळे पैसे हा खिशात घालतो.. शाळा ही खाजगी आहे परंतु जे टेम्परवारी लागलेल्या शिक्षिका आहेत, शिपाई आहेत त्यांच्याकडून हा दोन दोन लाख रुपये, चार चार लाख रुपये घेऊन त्यांना परमनंट करतो असं सांगतो, त्यांना परमनंटचे आमिष दाखवतो.. आणि असे बरेच शिक्षकांकडून आणि शिपायांकडून याने दोन दोन, चार चार, पाच पाच लाख रुपये घेतले आहेत.. जेव्हा आठवले साहेबांना ही बातमी कळाली आणि त्यांनी तात्काळ याच्यावर ॲक्शन घेऊन याचं प्राचार्य पदावरून याची हकाल पट्टी केली.. परंतु हा आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांना पुढे करून त्या पदावर घुसखोरी करत आहे आणि दुसऱ्यांवर आरोप करणे चालू केले आहे ..त्याचा भाऊ मोहन पवार याच्या दोन बायका आहेत.. याची दुसरी बायको आहे तिला याने त्या डीएड कॉलेजच्या शाळेच्या टेरेस वरती रूम बांधून राहायला जागा दिली आहे.. भ्रष्टाचार करत आजपर्यंत यांनी चार वर्षात स्वतःच्या चिकूच्या बागा, आंब्याच्या बागा, किवीच्या बागा, बंगले, पाच वर्षात उभे केले..

 

 जेव्हा ही बातमी आमच्या कानावर आली आणि आम्ही सगळे कागदपत्र घेऊन पोलिसांकडे धाव घेतली पोलिसांनी सांगितलं की, बी बी पवार हा तिथला प्राचार्य नाहीच आणि सोसायटीच लेटर त्यांच्या बाजूने असलं तरी, हायकोर्टचे लेटर हे आठवले साहेबांच्या बाजूने आहे.. त्यामुळे ही मालकी आठवले साहेबांकडे आहे.. तुम्ही तुमचा प्राचार्य ला बसवा.. दि. 28/3/25 रोजी संस्थेचे अध्यक्ष रामदास आठवले साहेबांनी प्राचार्य म्हणून देविका सूर्यवंशी यांची नियुक्ती केल्याने ते पदभार स्वीकारायला गेल्याने आम्ही शाळेत गेलो.. तिथे आम्ही चावी मागितली.. पण आम्हाला चावी कोणीही दिली नाही.. म्हणून आम्ही त्या शाळेतील कुलूप तोडले आणि आमचे कुलूप लावले.. आणि चावी पोलिसांच्या ताब्यात दिली.. आणि पोलिसांना सांगितलं जोपर्यंत डीसीपी साहेब निर्णय घेत नाही.. तोपर्यंत चावी आम्हालाही देऊ नका आणि त्यांनाही देऊ नका.. 

 

बी बी पवारच्या माणसांनी आम्ही लावलेले कुलूप तोडले… आणि स्वतः तिथे घुसखोरी केली.. बी बी पवार याचे धाबे दणाणलेले आहेत.. आणि वेड्यासारखे हे खोटे आरोप करू लागले आहे..आता याला म्हणावं आत मधला जो व्हिडिओ आहे तो पाठव.. नाहीतर परिणाम खुप वाईट होतील.. तुझी काय खैर नाही.. 

 

जर पीपल्स एज्युकेशन सोसायटी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या ताब्यात असली तर, त्यांनी तात्काळ या बीबी पवारची हकालपट्टी करावी.. कारण आनंदराज आंबेडकर साहेबांना हाताशी घेऊन हा गेम खेळतोय.. आम्ही आंबेडकर घराण्याला खूप मानतो.. आंबेडकर नावाने आम्ही जगतो.. पण आनंदराज साहेब अशा गुंड प्रवृत्तीचे विचाराला आसरा देत असतील तर, आम्ही काय समजायचे.. आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नवी मुंबईतील कार्यकर्त्यांना त्याने इमोशनल ब्लॅकमेल केले, खोटं नाट बोलून त्यांना आपल्या बाजूने केलंय.. आणि त्यांना घेऊन तो शाळेत दबदबा आणतोय.. त्यामध्ये वीरेंद्र लगाडे भाऊ जे जिल्हाध्यक्ष आहेत, रेखा इंगळे महिला जिल्हाध्यक्ष आहे, संगीता चौधरी आणि रायगडचे काही गुंड बोलवून तो सगळ्यांवर दबदबा आणतोय.. ही सगळी बातमी माझ्या कानावर आलेली आहे.. म्हणून मी ही पोस्ट टाकली आहे.. 

 

कारण चार वर्षांपूर्वी ह्या प्राचार्याने माझ्यासोबत पण घाणेरड्या भाषेत गैरवर्तन केले होते.. त्यावेळेस मी स्वतः आठवले साहेबांच्या पक्षातील संगीता आठवले यांना कॉल करून हा सगळा प्रकार सांगितला होता.. परत आदरणीय आनंद राज आंबेडकर साहेब यांच्या पक्षातील संगीता ताई डोळस यांच्याही कानावर ही बातमी घातली होती.. परत इतर संघटनेच्या कानावर ही बातमी घातली होती.. परंतु काहीही साध्य झाले नाही… लोकांनी काही मदत केली नाही.. मग मी शांत बसली.. पण चार वर्षानंतरही हा गैरप्रकार त्या शाळेत चालू आहे.. त्यामुळे मला पुढे यावे लागले.. तरी सर्व आंबेडकरी जनतेने याचा जाब विचारून बी बी पवार याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संस्थेत भ्रष्टाचार तसेच विनयभंग केल्याने त्याला चोप दिला पाहिजे…

Related Articles

2 Comments

  1. Shocking Conditions at PES Central School, Navi Mumbai: Students Left Without Teachers, Principal Abuses Students

    CBD Belapur, Navi Mumbai – Students of PES Central School, English Medium (Sector 1, CBD Belapur) have come forward with disturbing allegations about the school’s administration, highlighting a complete lack of basic educational infrastructure and abusive behavior by the school’s principal.

    According to a student from the 2024–2025 batch, the school has been functioning without essential subject teachers throughout the academic year. “We had no teachers for Mathematics, Science, Social Studies, Marathi, or even Computer. You can imagine how we managed to study. We were left on our own,” said the student.

    The situation worsens with the claim that a qualified Maths teacher was intentionally not allowed to teach due to the Principal’s personal reasons. Students also alleged that the Principal regularly uses vulgar and abusive language — including serious slurs targeting students’ mothers and sisters — creating a toxic and unsafe environment.

    One shocking incident involved a student who accidentally brought his personal diary containing song lyrics to school. “Instead of guiding him, the Principal physically assaulted him and shouted filthy abuses,” said a classmate who witnessed the event.

    Beyond the absence of teaching staff and abusive behavior, the school’s infrastructure is also reportedly in a poor state. “The condition of the washrooms is horrible — dirty, smelly, and unusable. There is a separate toilet built outside, but the Principal keeps it locked because he thinks students will misuse it,” added another student.

    Students and parents are now demanding urgent intervention from the education department. With claims that the Principal lacks basic English communication skills and leadership ability, questions are being raised about how such a person was appointed to such a critical role.

    This situation has reportedly impacted students’ academic progress and mental well-being. Stakeholders are now calling on local authorities to investigate and take appropriate action to ensure a safe and proper learning environment.

  2. Students Raise Alarm Over Abusive Principal and Lack of Teachers at PES Central School, Navi Mumbai

    Navi Mumbai, Maharashtra — Serious allegations have surfaced against the administration of PES Central School (English Medium), located in Sector 1, CBD Belapur, with students accusing the school of severe mismanagement, lack of faculty, and abusive behavior by the Principal.

    According to a student from the 2024–2025 academic year, the school has been operating without subject teachers for most of the year. “We didn’t have teachers for Maths, Science, SST, Marathi, or even Computer. It’s hard to imagine how students like us were supposed to study,” the student revealed.

    What’s more troubling is that a qualified Maths teacher was allegedly prevented from teaching due to the Principal’s personal disputes. Students claim that the Principal not only failed to ensure academic continuity but also created a toxic environment through his behavior.

    “The Principal uses abusive and vulgar language, including offensive slurs targeting mothers and sisters. It’s extremely disturbing and leaves a negative psychological impact on students,” said the student. One specific incident involved a student who accidentally brought a personal diary containing song lyrics — instead of resolving the matter calmly, the Principal reportedly hit the student and shouted obscene insults.

    Students further claim that the Principal lacks basic English communication skills and shows no competence in managing the school. Infrastructure issues add to the list of concerns. “The washrooms are in horrible condition — dirty, smelly, and often unusable. There’s another washroom outside, but the Principal keeps it locked claiming students might misuse it,” added the student.

    These alarming revelations have raised questions about the leadership and oversight at PES Central School. Students and parents are now urging the authorities to step in and ensure a safe, respectful, and education-friendly environment for all.

Leave a Reply to Farhan shaikh Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button