आपला जिल्हा आपली बातमीआर्थिक घडामोडीमहाराष्ट्र ग्रामीण

Zilla Parishad election date: मोठी बातमी ! जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा मुहूर्त ठरला? विधिमंडळाचे अधिवेशनच पुढे ढकलणार?

Zilla Parishad election date: मोठी बातमी ! जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा मुहूर्त ठरला? विधिमंडळाचे अधिवेशनच पुढे ढकलणार?

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका गेल्या चार वर्षांपासून रखडल्या होत्या. या रखडलेल्या निवडणुकीला आता मुहूर्त लागला आहे. राज्यातील 288 नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारी पार पडली. त्यासाठी 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. त्यातच आता दुसऱ्या टप्प्यात होत असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा मुहूर्त ठरला आहे. त्याची घोषणा दोन दिवसातच होणार असल्याची माहिती सुत्राने दिली.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात होत असलेल्या 288 नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. तर तिसऱ्या टप्यात राज्यातील महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.त्यातच आता राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा मुहूर्त देखील आता ठरला आहे. त्याची घोषणा दोन दिवसातच होणार असल्याची माहिती सुत्राने दिली. त्यामुळे पुढच्या महिन्यात होत असलेले राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या तिसऱ्या अथवा शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीची घोषणा लवकरच राज्य निवडणूक आयोगाकडून (Election Commission) करण्यात येणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 ते 20 डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता होती. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका 20 डिसेंबरनंतर होतील, अशी शक्यता होती. मात्र, आता यामध्ये बदल होणार असून दोन दिवसात निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे येत्या 20 ते 25 दिवसांत या निवडणुका होतील, अशी शक्यता आहे. तर महापालिकेच्या निवडणुका त्यानंतर जानेवारी महिन्यात पूर्ण केल्या जातील, असे समाजतेत्यामुळे 22 ते 30 डिसेंबर दरम्यान राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वच प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामाला लागली आहे. नगरपालिका व नगरपंचायतीनंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीला मुहूर्त लागणार आहे.

24 News Network

ताज्या बातम्या घडामोडी बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 9022978588

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button