हिंगोली माजी सभापती संतोष खोडके यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश

हिंगोली माजी सभापती संतोष खोडके यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश
हिंगोली (प्रतिनिधी : विकास लगड) — शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात माजी सभापती संतोष खोडके यांनी आज जाहीर प्रवेश केला.हा प्रवेश सोहळा जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, शिवसेना नेते भैय्या पाटील गोरेगावकर, दिनकरराव देशमुख, रूपाली पाटील गोरेगावकर, वसीमभाई देशमुख, उद्धवराव गायकवाड, परमेश्वर मांडगे, आणि गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.या वेळी तालुका प्रमुख संतोष आप्पा देवकर, माजी सभापती सोंडू पाटील, उपसभापती बाळासाहेब पोले, शहर प्रमुख जगन्नाथ देशमुख, कविताताई वडकुते, माजी जि.प. सदस्य राजेंद्र मोरे, संजय वाकोडे वडकूतेसाहेब, माणिकराव देशमुख, डॉ. खडसे, बबन नायक, अशोक गुंजकर, विजय खोडके आदी मान्यवर तसेच असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रवेशामुळे हिंगोली तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची संघटनात्मक ताकद आणखी बळकट झाली असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.



