हिंगोली जिल्हा मोटार मालक संघाकडून आमदार संतोष बंगार यांना निवेदन

हिंगोली (प्रतिनिधी):हिंगोली जिल्हा मोटार मालक संघाच्या वतीने कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बंगार यांना शासकीय विश्रामगृह येथे निवेदन देण्यात आले.
या निवेदनाद्वारे संघाने हिंगोली रेल्वे धक्का येथून चालणारी डी.ओ.सी., साखर, खत इत्यादी मालवाहतूक वसमत येथे वळविण्यात आली असून ती पुन्हा हिंगोली येथे सुरू करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
संघाचे म्हणणे आहे की, हिंगोली येथे जवळपास 100 हून अधिक लोकल वाहने आहेत, ज्यांचा उदरनिर्वाह रेल्वे धक्का येथील मालवाहतुकीवर अवलंबून आहे. त्यामुळे वाहतूक बंद झाल्याने या चालकांना उपासमारीची वेळ येत असल्याचे नमूद करण्यात आले.
तसेच हिंगोली येथे ट्रान्सपोर्ट नगरासाठी योग्य जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. संघाने पुढे सांगितले की, आरटीओ विभागाकडून छोट्या कारणांवरून २५ ते ४० हजार रुपयेपर्यंत दंड आकारला जातो, ज्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या दंडाची रक्कम कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदारांकडे करण्यात आली.
या निवेदनावेळी हिंगोली जिल्हा मोटार वाहन संघाचे अध्यक्ष शेख शिराज शेख सत्तार,साई श्रद्धा मिनी ट्रान्सपोर्टचे बाबा शेठ दराडे,साई ट्रान्सपोर्टचे बाळूभाऊ बनसोडे,सद्गुरू ट्रान्सपोर्टचे विकास लगड,एकता संघटनेचे अध्यक्ष दौलतखान पठाण व कुंडलिक सानप,ए.आर. रेहमान, शेख शकील, शेख मेराज, शेख एसार, सैयद बाबा आली हाजी साहेब, पंडित दीपके, स्वप्निल जैस्वाल, शेख नदीम शेख बाबा, जुबेर डॉन, शेख नवाब, गजानन कांबळे, शेख अमान, शेख आरिफ भाई तोफखाना, शेख रजाक तसेच संघाचे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.



