मी दक्ष” सायबर सुरक्षा जनजागृती मोहीम – हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्यावतीने विद्यार्थ्यांमध्ये सायबर सजगतेचा संदेश

“मी दक्ष” सायबर सुरक्षा जनजागृती मोहीम – हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्यावतीने विद्यार्थ्यांमध्ये सायबर सजगतेचा संदेश

हिंगोली प्रतिनिधी – केशव अवचार
https://youtu.be/TilKleuSwhA?si=_gEQMAgDgCjjcZXd
हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्यावतीने “मी दक्ष – सुरक्षित समाज आपली जबाबदारी” या उपक्रमांतर्गत सायबर सुरक्षा जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा उद्देश नागरिक आणि विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे.या अंतर्गत सेनगाव पोलीस स्टेशन तर्फे देवकृपा माध्यमिक विद्यालय, हात्ता आणि महाकाली उच्च माध्यमिक विद्यालय, हात्ता येथे सायबर सुरक्षा विषयावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रम माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. कृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. कमलेश मीना, आणि SDPO श्री. केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.या वेळी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुरक्षित वापर, सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची काळजी, पासवर्ड सुरक्षेचे महत्त्व, ऑनलाईन फसवणुकीपासून बचाव याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांसाठी सायबर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांचा पेन व हार देऊन सत्कार करण्यात आला.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत सजगतेची भावना निर्माण झाली असून, सुरक्षित डिजिटल समाजनिर्मितीच्या दिशेने हा एक उपयुक्त उपक्रम ठरला आहे.




