आपला जिल्हा आपली बातमीधाराशिव जिल्हा

धाराशिव नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 18 मधून अझहर मुजावर यांची दमदार दावेदारी

धाराशिव नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 18 मधून अझहर मुजावर यांची दमदार दावेदारी

धाराशिव जिल्हा प्रतिनिधी- नयुम शेख

धाराशिव – आगामी धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 18 मधून एआयएमआयएम (AIMIM) पक्षाकडून अझहर मुजावर हे प्रबल दावेदार म्हणून चर्चेत आले आहेत. समाजकार्यात सतत सक्रिय असलेल्या अझहर मुजावर यांनी धाराशिव शहरात गेल्या अनेक वर्षांपासून लोकसेवेचा ठसा उमटवला आहे.

कोरोना काळात त्यांनी आपल्या ACM ग्रुपच्या माध्यमातून कम्युनिटी किचन सुरू करून गरजू नागरिकांना मोफत जेवणाचा पुरवठा केला होता. एवढेच नव्हे तर, त्या कठीण काळात अनेकांना रुग्णसेवा पुरवली, ऑक्सिजन आणि वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली. समाजातील कोणी व्यक्ती मृत्युमुखी पडल्यास, त्यांच्या कुटुंबियांना आधार देत स्वतः त्यांच्या अंत्यविधीची जबाबदारीही त्यांनी पार पाडली, हे त्यांच्या मानवतावादी कार्याचे खरे उदाहरण ठरले.

रुग्णसेवा आणि सामाजिक कार्यात झोकून देत, त्यांनी नागरिकांच्या हाकेला तत्काळ प्रतिसाद दिला. त्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या धाराशिव शहरातील विविध सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. स्थानिक समस्यांबाबत आवाज उठवणे, तरुणांना एकत्र करून समाजहिताचे उपक्रम राबवणे आणि जनतेशी थेट संवाद ठेवणे यामुळे त्यांचा प्रभाव प्रभाग क्रमांक 18 मध्ये दिवसेंदिवस वाढत आहे.

आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी अझहर मुजावर यांनी एआयएमआयएमकडे अधिकृत उमेदवारीची मागणी केली असून, त्यांच्या कार्याची दखल घेत पक्ष त्यांना उमेदवारी जाहीर करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या मागे एकत्रितपणे उभा असलेला युवा वर्ग आणि समाजाचा विश्वास ही त्यांची सर्वात मोठी ताकद मानली जाते.

धाराशिव शहरात एआयएमआयएम पक्षाचा जनाधार वाढत असताना, अझहर मुजावर यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागात निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

24 News Network

ताज्या बातम्या घडामोडी बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 9022978588

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button