बहीण” योजनेत E-KYC अडचणीवर तोडगा निघणार – मंत्री अदिती तटकरे यांचे आश्वासन

बहीण” योजनेत E-KYC अडचणीवर तोडगा निघणार – मंत्री अदिती तटकरे यांचे आश्वासन.
धाराशिव जिल्हा प्रतिनिधी/ नयुम शेख.
राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी E-KYC प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, या प्रक्रियेदरम्यान अनेक लाभार्थीना OTP (वन टाइम पासवर्ड) वेळेवर न मिळणे आणि विविध तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागणे अशी गंभीर समस्या उभी राहिली आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी समाज माध्यमाद्वारे महिलांना आश्वस्त केले आहे. त्यांनी सांगितले की,
* या तांत्रिक अडचणीची गंभीर दखल शासनाने घेतली असून,
* तज्ञांच्या मदतीने समस्या सोडवण्याचे काम सुरू आहे, * लवकरच या अडचणींवर उपाययोजना करून E-KYC प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर केली जाईल.
“महिला लाभार्थीनी काळजी करण्याची गरज नाही. अल्पावधीतच ही समस्या सोडवून सर्वांसाठी प्रक्रिया सहज आणि सोपी करण्यात येईल,” असे स्पष्ट आश्वासन मंत्री तटकरे यांनी दिले.राज्य शासनाने महिलांच्या आर्थिक व सामाजिक सबलीकरणासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरू केली आहे. पात्र महिलांना या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी E-KYC करणे आवश्यक आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे अनेक लाभार्थीना OTP न मिळाल्याने त्यांचे काम अडखळत होते.
आता मंत्री तटकरे यांनी दिलेल्या आश्वासनामुळे लाभार्थीमध्ये दिलासा निर्माण झाला असून, पुढील काही दिवसांत ही प्रक्रिया सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.