फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित अभिवादन
धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त बोधिसत्त्व डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन

फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त बोधिसत्त्व डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन.
धाराशिव जिल्हा प्रतिनिधी:-नयुम शेख
..
धाराशिव:- ६९ व्या धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने बोधिसत्त्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस पुष्प अर्पण करुन सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली,फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेतील तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कानिफनाथ देवकुळे व स्वतंत्र कामगार संघटनेचे आनंद भालेराव यांच्या हस्ते धुप मेणबत्ती व पुष्प अर्पण करण्यात आले.यावेळी महामानवाच्या नावाचा जयघोष करण्यात आला.कलिंग युद्धातील जीवित हाणी,विनाश अशा भयावह तेची जाणिव सम्राट अशोकाला झाली आणि त्यातुन ते एक शांतताप्रिय शासक म्हणुन जगासमोर आले,कलिंग युद्धांनंतर नऊ दिवसाचा उत्सव साजरा करण्यात आला त्यानंतर सम्राट अशोकाने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तो दिवस म्हणजे विजयादशमी,दि.१४ ऑक्टोबर १९५६ रोजी बोधिसत्त्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे बौद्ध धम्माचा स्वीकार केला, यावेळी फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीचे अध्यक्ष गणेश वाघमारे, सचिव प्रवीण जगताप,उपाध्यक्ष संजय गजधने, सहसचिव संग्राम बनसोडे,कोषाध्यक्ष अंकुश उबाळे,बौध्दाचार्य व सदस्य बाबासाहेब बनसोडे,बौध्दाचार्य धनंजय वाघमारे,गुणवंत सोनवणे,बलभीम कांबळे,संपतराव शिंदे,डॉ.रमेश कांबळे,बापु कुचेकर,राजेंद्र धावारे सर, दलित मित्र विजय गायकवाड,मेसा जानराव, कुमार ओव्हाळ,श्रीकांत मटकिवाले,स्वराज जानराव,अतुल लष्करे,बाबासाहेब बनसोडे,नवनाथ वाघमारे,रोहिदास झेंडे,रविंद्र शिंदे,नाना वाघमारे,राजाराम बनसोडे,श्री आल्टे सह भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, महिला भगिनी नागरिक उपस्थित होते.