धाराशिव जिल्ह्यातील पुरग्रस्त परिस्थिती पाहता ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट मदत द्यावी
सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांची जिल्हाधिकारी कडे मागणी

धाराशिव जिल्ह्यातील पुरग्रस्त परिस्थिती पाहता ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट मदत द्यावी : सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांची जिल्हाधिकारी कडे मागणी
धाराशिव जिल्हा प्रतिनिधी :-नयुम शेख
धाराशिव जिल्ह्यात सातत्याने मुसळधार पाऊस पडत असुन नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे, शेतातील पिके नष्ट झाली तर सर्वत्र पाणी झाले असुन नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. शेतातील माती च पिके नष्ट होऊन केवळ दगड गोटे दिसत आहेत, व्याकुळ अशा अवस्थेत शेतकरी पुर्णपणे मृतावस्थेत दिसत आहेत. शेतकरी व शेतमजूर परत एकदा निराशाजनक झाला असून पिकांच्या उत्पादनावर येणाऱ्या पैशावर नियोजित बाबीची राखरांगोळी झाली आहे, पावसाची संततधार असल्याने बांधकामे बंद असुन बांधकाम कामगारांवरती उपासमारीची वेळ आली आहे, त्यांना देखील मदत आवश्यक आहे, सरकारने यावरती तात्काळ नियोजन व पाहणी करून शेतकऱ्याला सरसकट मदत केली पाहिजे आणि जी गाचे पाण्याखाली गेली आहेत ज्या त्या घरांची पडझड
झाली आहे, काही नागरिक दगावले या आजारी पडली असतील अशांना मदत देण्यात यावी. आरोग्य विभागाला मुबलक प्रमाणात औषधोपचार उपलब्ध झाले पाहिजेत, यात प्राणी जनावरांची देखील दखल घेण्यात येऊन दगावलेल्या जनावरांच्या पशु पालकांना मदतीचा हात पुढे केला पाहिजे, शहरातील तुंबलेल्या गटारी, रस्त्यावरील कचरा याकडे नगर परिषद विभागाने तातडीने लक्ष देऊन, साथीचे रोग पसरु नये, मच्छर, जंतु नाशक फवारणी करून होणा-या नागरिकांच्या आरोग्याचा विचार केला पाहिजे. आपण सर्व बाबीचा विचार करून धाराशिव जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करून जिल्हा वासियांना शासनाची मदत सरसकट करावी अशी विनंती निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे.