आपला जिल्हा आपली बातमी

देवगिरी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपण यशस्वी

देवगिरी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपण यशस्वी

 

परभणी,(प्रतिनिधी गजानन साबळेपरभणी :- 21 वर्षीय किडनी विकाराने त्रस्त शेतमजुराच्या मुलीला तिच्या वडिलांनी किडनी दान केली आणि येथील देवगिरी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये 9 सप्टेंबर रोजी किडणीचे प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले. दरम्यान, या घटनेमुळे परभणी जिल्ह्यातील डायलिसिस रुग्णांसाठी प्रत्यारोपणाची नवीन दारी खुले झाली आहे आणि स्थानिक रुग्णांसाठी मोठा आधार मिळाला आहे.

 

या यशस्वी प्रत्यारोपणामुळे परभणी जिल्हा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड नंतर तिसरा असा जिल्हा बनला आहे जिथे किडनी प्रत्यारोपण शक्य आहे. प्रत्यारोपण प्रक्रियेत डॉ. रवी कुलकर्णी, डॉ. हरिभाऊ गायकवाड, डॉ. अजय कुंडगीर व एडवोकेट पेकम यांनी रुग्णाला किडनी प्रत्यारोपणाचा परवाना दिला. शस्त्रक्रियेसाठी डॉ. राहुल टेंगसे, डॉ. पूजा टेंगसे, तसेच त्यांच्या टीमने अत्यंत प्रयत्न केले. यशस्वी शस्त्रक्रियेत डॉ. कौशल कोंडावार, डॉ. राजीव राठोड, डॉ. साईनाथ रेवनवार यांनी काम पाहिले. भूल देण्याचे काम डॉ. अमिताभ कडतन, डॉ. श्रुती शहारे व डॉ. सतीश राठोड यांनी केले. समन्वयकाचे काम मा. विनोद डावरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडले. मोफत उपचारात डॉ. संजय खिल्लारे, डॉ. संजय गिरी व डॉ. इमरान हाश्मी यांनी सहभाग घेतला. मार्गदर्शन व सहाय्यासाठी खच- अध्यक्ष डॉ. राजगोपाल कालानी आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांचा सहयोग मिळाला. अन्य डॉक्टरांची मदत: डॉ. गोविंद रसाळ, डॉ. कुबडे, डॉ. मनियार, डॉ. पुष्कराज देशमुख, डॉ. नरवाडे, डॉ. अशोक बन, डॉ. चांडक मॅडम व डॉ. मंत्री मॅडम. ऑपरेशन दरम्यान व नंतर डॉ. अंझर हाश्मी, डॉ. अफान काझी, डॉ. वैभव सांगोळे, डॉ. विशाल लकडे, राजू दराडे, अजहर शेख, हनुमान नाईक, अश्रि्वनी लोखंडे, शेख साहिल, करण हिंगे, अरबाज खान, अकिब, अबू तलहा, दिनेश रेंगे, संतोष घुले व विनोद गारुडी यांनी सेवा दिली.

या संपूर्ण यशस्वी प्रक्रियेत देवगिरी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. एकनाथ गबाळे व डॉ. श्रद्धा गबाळे यांचा विशेष वाटा आहे. दरम्यान, किडणी प्रत्यारोपण प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी विनोद डावरे (मो.9765998999) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

तातडीच्या उपचारामुळे तरुणीचे प्राण वाचले….

21 वर्षीय मूत्रपिंड विकाराने त्रस्त तरुणीवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्या आई-वडिलांची ब्लड ग्रुप तपासणी केल्यानंतर वडिलांचा ब्लड ग्रुप जुळला व त्यांची शारीरिक प्रकृती योग्य असल्याने त्यांचे मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी निवडण्यात आले. डॉक्टरांच्या योग्य मार्गदर्शनाने व तातडीच्या उपचारामुळे तरुणीचे प्राण वाचले असून ती सध्या पूर्णपणे व्यवस्थित जीवन जगत आहे, अशी माहिती डॉ. राहुल टेंगसे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. छत्रपती संभाजीनगर आणि नांदेडनंतर परभणीमध्येही किडनी प्रत्यारोपण यशस्वी झाले असून ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे, असेही डॉ. टेंगसे यांनी यावेळी म्हटले. या पत्रकार परिषदेस डॉ. कालानी, दादासाहेब टेंगसे, डॉ. अमोल कडतन, डॉ. कोंडावार, दीपक डावरे, डॉ. एकनाथ गबाळे व डॉ. श्रुती यांच्यासह तरुणीचे आई-वडील देखील उपस्थित होते. त्यांनी डॉक्टरांनी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button