नाशिकमध्ये पत्रकारांवर बेदम हल्ला – निषेधार्थ उद्या पत्रकारांची बैठक

नाशिकमध्ये पत्रकारांवर बेदम हल्ला – निषेधार्थ उद्या पत्रकारांची बैठक
नाशिकमध्ये पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून या हल्ल्यात एका वरिष्ठ पत्रकारांना दुखापत झाली आहे. मागील काही वर्षांपासून पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना सातत्याने वाढत असल्याने पत्रकार वर्गामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ इलेक्ट्रॉनिक मीडिया संघटनेच्या वतीने उद्या दुपारी पत्रकारांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. पुढारी न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी संतोषजी भिसे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या बैठकीत पत्रकारांवरील वाढत्या हल्ले व खोटे गुन्हे या गंभीर विषयांवर चर्चा होणार आहे.
बैठकीनंतर सोमवारी जिल्हा प्रशासनाला रीतसर निवेदन देण्यात येणार असून, सर्व प्रिंट, डिजिटल, युट्यूब आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.