रिसोड पोलिसांनी 12 मोटारसायकली चोरी करणारी टोळी केली जेरबंद

रिसोड पोलिसांनी 12 मोटारसायकली चोरी करणारी टोळी केली जेरबंद.
रिसोड : (प्रतिनिधी विशाल) गेल्या काही दिवसापासून वाशिम जिल्हा आणि आसपासच्या भागात मोटार सायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या.या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस स्टेशन रिसोडचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी डी. बी पथकाला विशेष मार्गदर्शन करून तपासाला गती दिली.तांत्रिक पद्धतीने व गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवत अखेर रिसोड पोलिसांनी 12 मोटारसायकली चोरी करणारी टोळी जेरबंद केली. डी. बी पथकाने 9 सप्टेंबर रोजी रिसोड येथील संशयित मयूर प्रवीण नवले वय 21 वर्ष माणुसकी नगर रिसोड,आणि गजानन उर्फ गणेश बळीराम गायकवाडवय 18 वर्ष राहणार माणुसकी नगर रिसोड.यांना ताब्यात घेतले चौकशीत दोघांनी वाशिम आणि बुलढाणा जिल्हातील विविध ठिकाणाहून मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली.त्याच्या कबुली जबाबाबवरून पोलिस स्टेशन रिसोड वाशिम शहर मेहकर लोणार आदि ठिकाणाहून चोरी गेलेल्या एकूण 12 मोटार सायकल याची किंमत आठ लाख पंचवीस हजार रुपये जप्त करण्यात आले. ही कार्यवाही पोलिस अनुज तारे, अप्पर पोलिस लता फड, सहायक पोलिस नवदीप अग्रवाल. यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वात पार पडली.
या यशस्वी मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, हवालदार प्रशांत राजगुरू, संजय रजवे, आशिष पाठक,रवी अढागळे, विनोद घनवट, परमेश्वर भोने , सुनील तिवाळे, प्रवीण गोपनारायन आणि विश्वास चव्हाण याचा मोलाचा सहभाग होता.