किंग्स फाउंडेशनचा अनोखा उपक्रम गणेशोत्सवानिमित्त १११११ मोदकांचे केले गणेश भक्तांना वाटप

किंग्स फाउंडेशनचा अनोखा उपक्रम गणेशोत्सवानिमित्त १११११ मोदकांचे केले गणेश भक्तांना वाटप
करमाळा प्रतिनिधी ५ सप्टेंबर रोजी छत्रपती श्री .शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सायंकाळी ठीक ७ वाजता हा कार्यक्रम पार पडला.
किंग्स फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा .युवा नेते शंभूराजे जयवंतराव जगताप यांच्या हस्ते १११११ मोदकांचे गणेश भक्तांना वाटप करण्यात आले. किंग्स फाउंडेशन हे गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी आपल्या सदस्यांमार्फत वेगवेगळे समाज उपयोगी कार्य करत असते. कोरोना काळात लोकांना मास्क पुरवण्याचे अत्यंत महत्त्वाचं काम याच फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले होते. किंग्स फाउंडेशन दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत असते व हे कार्यक्रम उत्कृष्ट रित्या पार पाडले जातात. सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त मागील दोन वर्षांपूर्वी तालुकास्तरीय नृत्य स्पर्धा ही आयोजित करण्यात आली होती. आजच्या या १११११ मोदक वाटप कार्यक्रमाला किंग्स फाउंडेशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाच्या वेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, पत्रकार नागेश पाटील सर ॲड .नवनाथ राखुंडे, एपीआय गिरिजा मस्के वतसेच किंग ग्रुपचे सदस्य पप्पू राखुंडे, संदीप पवार, ओंकार घोंगडे, विजय जाधव,प्रशांत पवार, अजिंक्य महाजन, भूषण महाजन, शिवम तांगडे, किरण फुटाणे, आयुष राखुंडे, अथर्व चव्हाण ,स्वप्नील झिंजाडे, किरण गेमाड ,प्रणव,तन्मय मोरे ,सुमित धाकपडे, जय खडके उपस्थिती दर्शवली.