जिल्हा बँक गैरव्यवहार प्रकरणी आज मुंबईत सुनावणी

जिल्हा बँक गैरव्यवहार प्रकरणी आज मुंबईत सुनावणी
उत्तर सोलापूर प्रतिनिधी पूनम दळवी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वाटपातील गैरप्रकरणासंदर्भात मुंबईत होणाऱ्या उपस्थित राहावे यासाठी माढयाचे माजी आमदार बबनदादा शिंदे अक्कलकोटचे माझीआमदार सिद्रामप्पा पाटील करमाळ्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्यासह नऊ जणांना नोटीस देण्यात आली आहे हे सुनावणी आज दुपारी मुंबईत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासमोर होणार आहे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 238 कोटीच्या नुकसानीस माझी संचालकांना महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 च्या कलम 88 नुसार जबाबदार धरण्यात आले आहे ती रक्कम वसुलीचे आदेश करण्यात आले आहे याशिवाय सांगोल्यातील शेकापचे नेते चंद्रकांत देशमुख मंगळवेढ्याचे बबनराव अवताडे सुरेखा ताटे पंढरपुरातील सुनिता बागल यांना अपील अर्जावरील सुनावणीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे