आपला जिल्हा आपली बातमी
कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांची वाकद गावातील पूरग्रस्त भागाला भेट

कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांची वाकद गावातील पूरग्रस्त भागाला भेट
वाकद, जि. वाशीम (वार्ताहर जितेंद्र जमधाडे) – दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तथा वाशीम जिल्ह्याचे पालक मंत्री मा. ना. दत्तात्रेय भरणे यांच्या जिल्हा दौर्याची सुरुवात झाली.
या दौऱ्यात त्यांनी वाकद गाव व परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पाहणीदरम्यान उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री भरणे म्हणाले की, “पूरग्रस्त नागरिकांना शासकीय नियमानुसार जास्तीत जास्त मदत दिली जाईल. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल.”
या पाहणीवेळी कृषी मंत्री भरणे यांच्यासोबत जिल्ह्यातील वरिष्ठ शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
यानंतर मा. ना. भरणे यांनी पुढील पाहणीसाठी वाशीमकडे रवाना झाले.