Uncategorizedअमरावती शहर
वाघोडा येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

वाघोडा येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
नांदगाव खंडेश्वर तालुका प्रतिनिधी सागर सव्वालाखे
आज दिनांक 23 जुलै 2025 रोजी दुपारी 5 वाजता नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाघोडा येथील शेतकरी तुकारामजी भलावी वय वर्ष 68 यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सतत शेतीमध्ये होणारे नुकसान व पिकाला न मिळालेले भाव यामुळे त्यांनी आत्महत्या केली. सरकारने कर्जमाफी करणार म्हणुन घोषणा केली पण न केलेला सातबारा कोर्याला मुख्य कारण आहे अशी चर्चा गावाकर्यांकडून व्यक्त होत आहे. त्यांच्या कडे 4 एक्कर शेती आहे. त्यांच्या मागे 2 मुले व 1 मुलगी (मोठा मुलाचे निधन झाले आहे) 3 नातू व पत्नी एवढा मोठा आप्त्यपरिवार आहे. त्यांची पत्नी सुद्धा सेवाग्राम हॉस्पिटल वर्धा येथे भरती आहे. त्यांच्या या निधनाने वाघोडा गावात शोककळा पसरली आहे.