अरण येथील कार्तिक खंडाळे याचा खुण त्याचा चुलत भाऊ संदेश खंडाळे याने केल्याचे तपासात निष्पन्न.आरोपीस टेंभुर्णी पोलिसांनी केली अटक

अरण येथील कार्तिक खंडाळे याचा खुण त्याचा चुलत भाऊ संदेश खंडाळे याने केल्याचे तपासात निष्पन्न.आरोपीस टेंभुर्णी पोलिसांनी केली अटक
………………………………………..
सोलापूर जिल्हा
प्रतिनिधी बाळासाहेब देवकुळे.
………………………………………..
टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील मौज अरण तालुका माढा येथील कार्तिकी आई सौ हर्षदा बळीराम खंडाळे यांनी यांनी दिनांक 16 /07 /2025 रोजी सायंकाळी पाच वाजता जि प प्राथमिक शाळा अरण येथून घरी आला व नंतर सावता माळी शाळेच्या मैदानावर खेळायला जातो असे सांगून घरातून निघून गेला परंतु तो रात्री नऊ वाजेपर्यंत घरी आला नाही. त्यामुळे त्यांचे सह घरातील सर्व मंडळींनी रात्री दहा ते सकाळपर्यंत परिसरात शोधा शोध केली परंतु तो कुठेही आढळून आला नाही. नंतर दिनांक 16/07 2025 रोजी आईने टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली सदर तक्रार गुन्हा रजिस्टर नंबर 419 /25 भांदवी कलम 137(2) अंतर्गत नोंद करण्यात आली. अंतर्गत नोंद करण्यात आली सदर गुन्ह्यातील बेपत्ता मुलगा यांचा पोलीस व स्थानिक नागरिकांनी सातत्याने शोध घेतला असता दि19/07/2025 रोजी सदर मुलगा मोडलिंब तुळशी रस्त्यालगत कोरड्या कॅनलमध्ये जाधवाडी बैरागवाडी शिवारात मृत अवस्थेत आढळून आला घटनेची माहिती मिळताच फाॅरेन्सिक टीम, डाॅग स्काॅड,फिंगर प्रिंट तज्ञ, स्थानिक गुन्हे शाखा आणि टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा स्वान कडून तपासणी इत्यादी प्रक्रिया पूर्ण केल्या सदर मृतदेहाची तपासणी पंचनामा करून शवविच्छेदन (पोस्ट मॅर्टेम) करण्यासाठी सोलापूर ग्रामीण रुग्णालय सिविल हॉस्पिटल सोलापूर येथे पाठवले घटनास्थळावरील परिस्थितीवरून व बालकाचे वडील बळीराम खंडाळे यांचे पुरवणी जबाब वरून सदर बालकास कोणीतरी कोणत्यातरी कारणावरून हत्यारांनीजगबग त्याला जीवे ठार मारले असावे व तपासात निष्पन्न झाले वरून सदर गुन्ह्यात, दि 19/07/2025 रोजी
BNS कलम 103 (1) 140(1) 238 (अ) हे कलम वाड केली आहे. पुढे गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्ह्याच्या पुराव्याचे तांत्रिक विश्लेषणावरून कार्तिक मयताचा चुलत भाऊ संदेश सहदेव खंडाळे यांनी खून केला असल्याचे तपासात08 निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्याच ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केला असल्याचे कबूल केले असल्याने. त्याला दि 20/07/2025 रोजी 3 वा अटक केली आहे. गुन्हा करण्याचे कारण घरगुती असल्याचे सांगितले आहे. सदर आरोपीस माढा कोर्टात हजर केले असता त्याला तीन दिवस पोलीस कस्टडी दिली आहे गुन्ह्याचा तपास टेंभुर्णी पोलीस निरीक्षक नारायण पवार हे करीत आहेत. गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याकडे अधिक तपास करण्यात येत आहे. सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मा जिल्हा पोलीस अधीक्षक मा अतुल कुलकर्णी.साहेब
मा अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर मा उपविभागीय पोलिस आधीकारी करमाळा अजीत पाटील. मा उपविभागीय पोलिस आधीकारी बार्शी जालिंदर नालकुल यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर, ग्रामीणचे संजय जगताप. टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण पवार. सहाय्यक पोलिस निरीक्षक खुणे .सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरिश जोग.पोलिस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के.पोलिस उपनिरीक्षक अजित मोरे. पोलिस उपनिरीक्षक पुरूषत्तम धापटे. महिला पोलिस उपनिरीक्षक स्वाती सुरवशे. श्रेणी पोलिस उपनिरीक्षक मुजावर. स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण व टेंभुर्णी पोलीस ठाणे कडील सर्व पोलीस आमलदार यांनी सर्व काम पाहिले………………………………..
24 न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब देवकुळे.