आपला जिल्हा आपली बातमी

पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन..देवकुळे

पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन..देवकुळे.

……………………………………………… 

दि.३०एप्रिल २०२५.

   माढा तालुक्यातील कुईवाडी येथे जोशाबा बहुउदेशिय सामाजिक संस्थेतर्फे साहित्यिक व सामाजिक तसेच शिक्षक, कवी व विविध क्षेत्रातील बंधू भगिनींना जोशाबा आदर्श सन्मान पुरस्कार रविवार दिनांक २५ मे २०२५ रोजी प्रदान करण्यात येणार असून या आदर्श सन्मान पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जोशाबा बहुउदेशिय सामाजिक संस्था चिंचोली तर्फे आयोजित केला आहे.या पुरस्काराचे हे ३ रे वर्षे असून हा कार्यक्रम भव्य दिव्य होणारं आहे.

आपल्या शैक्षणिक, साहित्यिक, कवी, शेतकरी, सामाजिक विविध क्षेत्रातील कार्याचा प्रस्ताव 

दि १० |०५|२०२५ पर्यंत पाठवायचे आहेत. 

पुरस्काराचे स्वरूप आकर्षक स्मृतींचिन्ह,मानपत्र, शाल,पेन,असे असुन तालुक्याचे आमदार व जिल्ह्यातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहे.प्रस्ताव एका प्रतित व दोन रंगीत  

छायाचित्रासह श्री बाळासाहेब देवकुळे.द्वारा जोशाबा बहुउदेशिय सामाजिक संस्था चिंचोली ता माढा जि सोलापूर पिन कोड ४१३२०८ या

पत्यावर पाठवावा.तसेच पुरस्कार देण्याचे अधिकार निवड समितीला रहातील असे संस्थेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संस्थेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब देवकुळे.

मो.९७३०१०३४८६.

खजिनदार.

श्री आबासाहेब खंडाळे.

मो.नं.९५५२७८४९४२.

यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. 

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी.

  -श्री बाळासाहेब देवकुळ

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button