आपला जिल्हा आपली बातमीवाशिम जिल्हा विशेष

बाबासाहेब गोपले भवन येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

बाबासाहेब गोपले भवन येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

वाशिम : क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले भवन, लहुजी नगर, वाशीम येथे दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय मातंग संघाच्या वतीने करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रभानजी पौळकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त, प्रमुख उपस्थिती आनंद सुतार सर, कैलास थोरात राज्य कार्यकारणी सदस्य लहुजी शक्ती सेना, एडवोकेट संजय इंगोले, संजय वैरागड राज्य कार्याध्यक्ष अखिल भारतीय मातंग संघ, संतोष इंगळे जिल्हाध्यक्ष डीपीआय, मोहनराज दुतोंडे जिल्हाध्यक्ष लहुजी शक्ती सेना, मेजर गोपाल आवारे,आर के पाटोळे जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मातंग, सिताराम डोंगरे तालुकाध्यक्ष, ठेकेदार नारायण डाखोरे, ठेकेदार विजय लोंढे, गजानन भालेराव, समाजसेवक सुभाष रोकडे, मधुकर खिल्लारे, मोतीराम कांबळे, आदींची उपस्थिती होती. सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले.यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला संविधान देऊन समस्त भारतीयांना मूलभूत हक्क व अधिकार मिळवून दिले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जातीच्या चष्म्यातून न पाहता संपूर्ण भारतातील सर्व नागरिकांकरीता त्यांनी अलौकिक कार्य केले आहे बाबासाहेबांची विचार भारतच नव्हे तर जगातील अनेक देशांनी स्वीकारून आपला विकास करून घेतलेला आहे. त्यामुळे बाबासाहेब एक जागतिक समाज सुधारक आहेत. त्यांचे विचार भारत देशासह जगाला प्रेरणादायी आहेत असे मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाला क्रांतिवीर लहुजी नगरातील बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते. उपस्थितांचे अखिल भारतीय मातंग संजय वैरागड कार्यक्रमाचे आयोजक यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रास्ताविक आर के पाटोळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button