वाशिम जिल्हा विशेष

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मानोरा वतीने तहसीलदार साहेब यांना निवेदन

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मानोरा वतीने तहसीलदार साहेब यांना निवेदन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे व वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष वाशिम गजानन भाऊ वैरागडे यांच्या नेतृत्वात मनसेचे निवेदन ग्रामीण भागात 1 लाख 20 हजार देण्यात येतो तर शहरी भागात 2 लाख 50 हजार देण्यात येतो परंतु या एवढ्या कमी रकमेत घरकुलाचे बांधकाम पूर्ण करणे शक्य नसल्यामुळे ग्रामीण भागातील बरेचसे लाभार्थी सावकाराकडून कर्ज घेऊन घराचे बांधकाम पूर्ण करावे लागते त्यामुळे बरेचसे लाभार्थी कर्जबाजारी झाले आहेत बांधकामासाठी लागणारे साहित्याची किंमत जसे सिमेंट लोखंड रेती वीट यांची किंमत शहरी भागात व ग्रामीण भागात सारखीच आहे असे असून सुद्धा ग्रामीण भागातील लाभार्थ्यावर नाहक अन्याय होत आहे तरी शासनाने या विषयावर लक्ष घालून ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यावर होणारा अन्याय दूर करावा व ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचे घरकुलाची रक्कम वाढवून देण्यात यावी याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित कृषी सेना जिल्हाध्यक्ष विठ्ठल राठोड मानोरा शहर अध्यक्ष महादेव भस्मे कृषी सेना जिल्हा उपाध्यक्ष लखन राठोड कुपटा सर्कल अध्यक्ष संतोष घोडे व मनसे सैनिक गौरव आडुळे जयदीप इंगळे व कार्यकर्ते उपस्थित होते

24 News Network

ताज्या बातम्या घडामोडी बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 9022978588

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button