आपला जिल्हा आपली बातमीपरभणी

Parbhani : रमजानच्या खरेदीने बाजारपेठ गजबजली; आर्थिक उलाढाल वाढली

Parbhani : रमजानच्या खरेदीने बाजारपेठ गजबजली; आर्थिक उलाढाल वाढली

परभणी (Parbhani) पवित्र रमजान महिना २ मार्चपासून सुरू झाला असून, बाजारपेठेत आता खरेदीला वेग आला आहे. जनता बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अपना कॉर्नर, गांधी पार्क या भागात ईद (Eid) सणासाठी लागणार्‍या वस्तुची दुकाने थाटली आहेत. तर कापड बाजारातही मोठी रेलचेल वाढली आहे.

बाजारपेठेत लाखो रुपयांची होते उलाढाल

रमजान ईदला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विविध वस्तुची खरेदी केली जाते. त्यामुळे बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल होते. यावर्षी देखील रमजान ईद मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी लगबग सुरु झाली आहे. सायंकाळी ग्रँड कॉर्नर, अपना कॉर्नर, जनता बाजार, जूना मोंढा या भागात विविध वस्तूचे स्टॉल लागले आहेत. त्याच प्रमाणे कापडबाजार, रेडीमेड कापड दुकान, चप्पल, सौंदर्य प्रसाधने, सुकामेवा, शेवया, परफ्युम, टोप्या, रुमाल खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. त्यामुळे या भागातील वाहतुक सायंकाळी बंद करण्यात येत आहे. वाहतूकीची कोंडी (traffic jam) होऊ नये म्हणून वाहतुक पोलिस शाखेने नियोजन केले आहे. त्यामुळे खरेदी करणे ग्राहकांना सोयीचे ठरत आहे. एकंदर सध्या रमजानच्या खरेदीला वेग आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button