अपरिचित इतिहासआर्थिक घडामोडीउद्योग विश्वखेळ

XL साईज काँडम आण, मी आता मेसेज डिलीट करते’, प्रसिद्ध उद्योगपतीने उघड केलं पत्नीचं अफेअर, स्क्रीनशॉट व्हायरल

XL साईज काँडम आण, मी आता मेसेज डिलीट करते’, प्रसिद्ध उद्योगपतीने उघड केलं पत्नीचं अफेअर, स्क्रीनशॉट व्हायरल

रिपलिंग कंपनीचा संस्थापक प्रसन्ना शंकर याने आपली पत्नी दिव्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचं उघड केलं असून, त्याचे पुरावेही शेअर केले आहेत. तसंच आपल्याला जाणुनबुजून पोलिसांच्या माध्यमातून त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे. रिपलिंग कंपनीचा संस्थापक प्रसन्ना शंकर याने आपली पत्नी दिव्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचं उघड केलं असून, त्याचे पुरावेही शेअर केले आहेत. तसंच आपल्याला जाणुनबुजून पोलिसांच्या माध्यमातून त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे. भारतीय उद्योजक आणि रिपलिंगचा सह-संस्थापक प्रसन्न शंकर याने आपली पत्नी दिव्या शशीधरवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचं उघड करत त्याचे पुरावेही एक्सवर शेअर केले आहेत. तसंच चेन्नई पोलीस दिव्या शशिधरच्या बाजूने असून, आपल्याला त्रास देत असल्याचा आरोपही केला आहे. मी सध्या चेन्नई पोलिसांपासून पळ काढत असून तामिळनाडूच्या बाहेर असल्याचं त्याने सांगितलं आहे. तर दुसरीकडे दिव्या शशिधरने प्रसन्नावर “लैंगिक विकृती” आणि “अपहरण” केल्याचा आरोप केला आहे.

 

प्रसन्ना शंकर यांनी रविवारी एक्सवर एकामागोमाग एक अनेक पोस्ट शेअर करत पत्नी दिव्यासोबतच्या घटस्फोटाच्या प्रक्रियेची माहिती दिली. प्रसन्ना शंकरने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या लग्नाला 10 वर्षं झाली असून, त्यांना नऊ वर्षांचा मुलगा आहे. दिव्याचे अमेरिकेत सहा महिन्यांपासून अनुप नावाच्या व्यक्तीसोबत सहापेक्षा जास्त महिन्यांपासून प्रेमसंबंध होते आणि प्रियकराच्या पत्नीने त्याला मेसेज केल्यानंतर त्याला हे कळलेपोस्टमध्ये त्याने पुढे सांगितलं आहे की, “त्यानंतर आम्ही आमच्या घटस्फोटाच्या रकमेसाठी तिला किती रक्कम द्यावी लागेल या अटींवर वाटाघाटी करत होतो. ती यावर आनंदी नव्हती. तिने माझ्याविरुद्ध मारहाण केल्याची खोटी तक्रार करण्याचा निर्णय घेतला. नंतर, तिने आणखी खोट्या तक्रारी केल्या की मी तिच्यावर बलात्कार केला, तिचे नग्न व्हिडिओ प्रसारित केले. सिंगापूर पोलिसांनी या आरोपांची चौकशी केली आहे, ते निराधार असल्याचे आढळले आहे आणि मला सर्व आरोपांमधून मुक्त केलं आहे”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button