सटाणा-अहवा बस सेवा पुन्हा सुरु करण्याची प्रवाशांची मागणी

सटाणा-अहवा बस सेवा पुन्हा सुरु करण्याची प्रवाशांची मागणी
जिल्हा प्रतिनिधी – राजेंद्र पवार, सह. शाम मोरे
सटाणा : सटाणा आगारातून दररोज सकाळी ७ वाजता सुटणारी सटाणा-अहवा बस सेवा गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे. या बसचा थांबा मुल्हेर येथे सकाळी ८:१५ वाजता असून, या बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता.
सदर बससेवा बंद केल्याने अनेक प्रवाशांसह रुग्णवर्गाला मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे, कारण या मार्गावरून अनेक नागरिक उपचारासाठी गुजरात राज्यात जातात. प्रवाशांना आता खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने त्यांचा वेळ आणि आर्थिक भार दोन्ही वाढले आहेत.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, सटाणा-अहवा बस सेवा सुरू असताना सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळत होता. त्यामुळे सटाणा आगार प्रमुखांनी प्रवाशांच्या मागणीचा विचार करून ही बस सेवा तातडीने पुन्हा सुरु करावी, अशी एकमुखी मागणी स्थानिक प्रवाशांकडून करण्यात आली आहे.




