भारतीय हवामान विभागाने (IMD) लातूर, धाराशिव व बीड जिल्ह्यात पुढील काही तासासाठी #RedAlert

धाराशिव जिल्हा प्रतिनिधी:-नयुम शेख
भारतीय हवामान विभागाने (IMD) लातूर, धाराशिव व बीड जिल्ह्यात पुढील काही तासासाठी #RedAlert जारी केला आहे. या काळात जोरदार ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वांनी सुरक्षित स्थळी थांबावे, शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे, नदी नाल्याच्या ठिकाणी पूर परिस्थिती आहे त्यामुळे या ठिकाणाहून पुढे जाण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. अनेक ठिकाणी रस्ते बंद असण्याची शक्यता आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास टाळणे आवश्यक आहे, धोकादायक घरापासून किंवा इमारतीपासून सर्वांनी दूर राहणे गरजेचे आहे.
प्रशासकीय यंत्रणेला अगोदरच सूचना मिळालेल्या असल्यामुळे ती यंत्रणा सजग आणि दक्ष आहे. या यंत्रणांकडून येणाऱ्या सूचनांचे गांभीर्यपूर्वक सर्वांनी पालन करावे ही विनंती आहे.
लातुर, धाराशिव,बीड अतिवृष्टी पूर रेडअलर्ट