हिंगोली जिल्हा

विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ, कोळसा येथे सायबर सुरक्षा सप्ताहानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रम

विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ, कोळसा येथे सायबर सुरक्षा सप्ताहानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रम

हिंगोली जिल्हा प्रतिनिधी – केशव अवचार

कोळसा – सेनगाव पोलिस स्टेशनच्या वतीने विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ, कोळसा येथे “सायबर सुरक्षा सप्ताह” या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. भास्करराव बेंगाळ साहेब होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेनगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. दिपक मस्के, पोलिस कॉन्स्टेबल श्री. जाधव, श्री. क्षिरसागर, तसेच संस्थेचे सचिव श्री. अंकुशराव बेंगाळ, उपाध्यक्षा आनंदीताई बेंगाळ, प्राचार्य अभिषेक भैय्या बेंगाळ, मुख्याध्यापक श्री. शिंदे सर, श्री. सरकटे सर, आणि पर्यवेक्षक श्री. कसाब सर उपस्थित होते.

सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करताना श्री. दिपक मस्के साहेब यांनी सांगितले की, आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन आणि आर्थिक गुन्हेगारी वेगाने वाढत आहे. जर कोणाची ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर नागरिकांनी महाराष्ट्र शासनाचा टोल-फ्री क्रमांक 1930 किंवा केंद्र शासनाचा क्रमांक 1945 वर संपर्क साधावा. तसेच पोलिस प्रशासनाचा आपत्कालीन क्रमांक 112 देखील वापरता येतो.ते पुढे म्हणाले की, मोबाईलचा वापर करताना सतर्क राहा. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि कोणत्याही ऑनलाईन आमिषाला बळी पडू नका, कारण कोणीही फुकट पैसे देत नाही.अध्यक्षीय भाषणात श्री. भास्करराव बेंगाळ साहेब म्हणाले की, “शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळू नये. शिक्षणाचा खरा उपयोग तोच, जो समाजाला आदर्श घडवतो.”कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शिंदे सर यांनी केले. या प्रसंगी सर्व शिक्षकवर्ग, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

24 News Network

ताज्या बातम्या घडामोडी बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 9022978588

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button