249 नगरपरिषद आणि 145नगर पंचायतींसाठी नगराध्यक्ष आरक्षण सोडत

249 नगरपरिषद आणि 145नगरपंचायतींसाठी नगराध्यक्ष आरक्षण सोडत..
धाराशिव जिल्हा प्रतिनिधी:-नयुम शेख
नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीची घोषणा – ६ ऑक्टोबर रोजी मंत्रालयात सोडत.
मुंबई (दि. ३ ऑक्टोबर) – महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायतींमधील नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणासाठीची सोडत येत्या सोमवार, दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी काढण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून देण्यात आली आहे.
नगर विकास विभागाच्या निवेदनानुसार, राज्यातील एकूण २४९ नगरपरिषद व १४५ नगरपंचायतींतील नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी ही सोडत मंत्रालय, मुंबई येथील ६ वा मजला, परिषद सभागृहात आयोजित केली जाणार आहे.सुरक्षा व शिस्तीच्या कारणास्तव मंत्रालयातील प्रवेशावर मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे, या सोडतीच्या वेळी सर्व राजकीय पक्षांना त्यांच्या वतीने फक्त दोन प्रतिनिधी पाठविण्याची परवानगी देण्यात आली आहे. संबंधित पक्षांचे अध्यक्ष किंवा सचिव यांनी दोन प्रतिनिधींची नावे शासनाकडे शिफारस करावी, असे आवाहन शासनाच्या उप सचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी केले आहे.
या सोडतीनंतर राज्यातील नगराध्यक्ष पदांसाठी आरक्षणाची अंतिम रूपरेषा निश्चित होणार असून, पुढील निवडणूक प्रक्रियेसाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.