आपला जिल्हा आपली बातमी

वंचितच्या जन आक्रोश महामोर्चास सर्व सामान्य जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे…..ंमहासचिव किशोर भोले

वंचितच्या जन आक्रोश महामोर्चास सर्व सामान्य जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे…..ंमहासचिव किशोर भोले 

सर्व सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आता सत्ताधाऱ्यांना कुठलेही देणेघेणे राहिलेले नाही खोटे आश्वासन देऊन सर्व सामान्य जनतेचे मते घ्यायचे आणि खुर्ची मिळाली कि सामान्य जनतेला वार्यावर सोडायचे परंतु नेहमी सातत्याने कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर ,उपेक्षित, निराधार ,बेघर, भुमिहीन, वंचित यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कायम सोबत असते संविधानिक हक्क आणि अधिकारा पासून कोसो दूर असलेल्यांना कायद्यानुसार पध्दतीने प्रश्न सोडविण्यासाठी एकमेव आदरणीय अँड बाळासाहेब आंबेडकर हे कायम सोबत असतात त्यामुळे सर्व सामान्य जनतेने लक्षात घेतले पाहिजे की आदरणीय अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय सामाजिक लढ्यात सर्व सामान्य जनतेने एकजुटीने सोबत राहुन येणार्या काळात वंचित बहुजन आघाडीची ताकत वाढवली पाहिजे म्हणून वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्या वतीने दिनांक 12/09/2025 वार शुक्रवार रोजी ठिक 11 00 वाजता तहसील कार्यालयावर “जन आक्रोश महामोर्चा” धडकणार आहे या मार्चमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचितचे राज्य महासचिव तथा जिल्हा प्रभारी प्रा किसन चव्हाण सर असणार आहेत तर वंचितचे जिल्हा अध्यक्ष अजय सरवदे यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत तसेच प्रमुख पाहुणे म्हणून तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष प्रा विष्णू जाधव सर इंजिनिअर विष्णू दादा देवकते असणार आहेत आणि विशेष उपस्थितीमध्ये जिल्हा पदाधिकारी तालुका निरिक्षक हे आहेत तालुका अध्यक्ष अजयकुमार पप्पू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार असून वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुका पदाधिकारी आयोजित हा जन आक्रोश महामोर्चा निघणार आहे तरी तालुक्यातील सर्व गायरान धारक , निराधार, अपंग, शेतकरी,शेतमजूर, अल्पभूधारक, कष्टकरी कामगार घरकुलापासुन वंचित राहीलेले घरकुल धारक यासह गेवराई तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा सम्यक विद्यार्थी आंदोलन युवक आघाडी माथाडी कामगार आघाडी समता सैनिक दल महिला आघाडीसह चळवळीतील आजी माजी तालुका पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुका महासचिव किशोर भोले यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button