तेलंगणात प्रथमच साजरी झाली साहित्य सम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती

तेलंगणात प्रथमच साजरी झाली साहित्य सम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती.
मेनूर (ता. मदनूर, जि. कामारेड्डी, तेलंगणा) –
दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी मौजे मेनूर येथे साहित्य सम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती अतिशय मोठ्या आणि भव्य स्वरूपात साजरी करण्यात आली. महाराष्ट्राच्या सीमाभागापलीकडे, तेलंगणा राज्यातील या गावात प्रथमच हा सोहळा पार पडला असल्याने तो ऐतिहासिक ठरला.
मेनूर हा भाग तेलगू भाषिक असला तरी येथे मराठी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे. गावातील सुमारे २०० ते २५० घरे मातंग/मादीगा समाजाची असून यंदा पहिल्यांदाच समाजबांधवांनी एकत्र येऊन अण्णाभाऊंच्या जयंतीचे आयोजन केले.या पहिल्या जयंती सोहळ्यात प्रमुख मराठी भाषिक वक्ता म्हणून मला निमंत्रण देण्यात आले होते. विशेष म्हणजे, महाराष्ट्राबाहेर तेलगू भाषेत डॉ. अण्णाभाऊंचे विचार मांडण्याची संधी मिळाली. त्यामुळे अण्णाभाऊंच्या क्रांतिकारी व समतेच्या विचारांचा प्रसार महाराष्ट्राबाहेर होण्याचा मार्ग खुला झाला.
जयंती उत्सवाला उपस्थित मान्यवरांमध्ये –मास नांदेड जिल्हा सचिव सुनील गायकवाड ,मास देगलूर तालुका अध्यक्ष संतोष नामवाड,मास मुखेड तालुका अध्यक्ष सुनील तोटरे मास देगलूर तालुका सचिव सुभाष वाघमारे मास कला व सांस्कृतिक विभाग, देगलूर तालुका प्रमुख तथा ख्यातनाम शाहीर-गायक विश्वनाथ भालेराव मास मुखेड युवक तालुका अध्यक्ष संदीप नामवाड,तसेच विठ्ठल गायकवाड, सिद्राम पवळे सर यांच्यासह मौजे मेनूर येथील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. अण्णाभाऊंच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि विचारसरणीवर भाष्य करण्यात आले. अण्णाभाऊंची समतेची ज्योत सीमोल्लंघन करून सर्वत्र पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.या ऐतिहासिक पहिल्या जयंती सोहळ्यामुळे मराठी भाषिक समाजात अभिमानाची भावना असून, मेनूर ग्रामस्थांनी दाखविलेला एकोपा व उत्साह वाखाणण्याजोगा ठरला आहे.
👉 ताज्या बातम्या व घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करा.
📞 बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क: ९०२२९७८५८८
मुख्य संपादक – नितीन थोरात