समाजसेवक सुदाम उकंडजी डोके यांना “समाजभूषण पुरस्कार २०२५
इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्ट, नवी मुंबई तर्फे गौरव

समाजसेवक सुदाम उकंडजी डोके यांना “समाजभूषण पुरस्कार २०२५
समाजसेवक सुदाम उकंडजी डोके यांना “समाजभूषण पुरस्कार २०२५”
इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्ट, नवी मुंबई तर्फे गौरव
वाशी (प्रतिनिधी):
समाजातील वंचित, गरीब घटकांच्या उन्नतीसाठी आणि सामाजिक ऐक्य व विकासासाठी सतत कार्यरत असलेल्या समाजसेवक मा. श्री. सुदाम उकंडजी डोके, नवी मुंबई यांना इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे “समाजभूषण पुरस्कार २०२५” ने सन्मानित करण्यात आले.
विश्रांत भावे नाट्यगृह, वाशी येथे पार पडलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री सुदाम उकंडजी डोके यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्यांच्या अथक परिश्रम, नि:स्वार्थ सेवाभाव आणि प्रामाणिक कार्यामुळे समाजात आशेचा किरण निर्माण झाला आहे. त्यांनी समाजातील दुर्बल घटकांना आधार देऊन सामाजिक ऐक्य आणि मानवतेचा संदेश जपला आहे.
समाजासाठी केलेल्या या कार्याची दखल घेऊन ट्रस्टचे अध्यक्ष श्री. दिलीपकुमार राजेन्द्र गायकवाड यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
या गौरवामुळे समाजातील कार्यकर्त्यांना नवी प्रेरणा मिळणार असून, सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यास अधिक वेग मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला