RSS ही मातंग समाजाला विघातक – आरोप

RSS ही मातंग समाजाला विघातक – आरोप
नवी मुंबई: प्रतिनिधी नितीन थोरात मुख्य संपादक
मातंग समाज शतकानुशतकांपासून अन्याय व उपेक्षा सहन करत आला आहे. आजही हिंदू वर्णव्यवस्थेतून होणाऱ्या अत्याचारांपासून तो मुक्त झालेला नाही. अशा परिस्थितीत RSS ही संघटना मातंग समाजाच्या विकासाला पोषक नसून उलटपक्षी विघातक असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारधारेला न मानणाऱ्या RSS संघटनेचा मातंग समाज फक्त राजकीय स्वार्थासाठी वापर होत असल्याचे वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.
स्वतःला हिंदू म्हणून समजणारा मातंग समाज हा अजूनही विकासाच्या प्रवाहापासून कोसो दूर आहे. मात्र भ्रष्ट राजकीय नेते व संघटनांच्या चुकीच्या संदेशांना बळी पडून हा समाज दिशाहीन होत असल्याचे चित्र समोर आले आहे.
मातंग समाजाने शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांना स्वीकारून आपल्या हक्कांसाठी सजग राहण्याचे आवाहनही या वेळी करण्यात आले.