आपला जिल्हा आपली बातमी
प्रवीण बोरकर यांनी दिले दोन घोरपडींना जीवनदान
माणूस आणि निसर्ग यांचा समन्वय टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे, याचे उत्कृष्ट उदाहरण बीड येथील प्रवीण बोरकर यांनी घालून दिले आहे.

प्रवीण बोरकर यांनी दिले दोन घोरपडींना जीवनदान
बीड : माणूस आणि निसर्ग यांचा समन्वय टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे, याचे उत्कृष्ट उदाहरण बीड येथील प्रवीण बोरकर यांनी घालून दिले आहे.
शेतात काम करत असताना प्रवीण बोरकर यांच्या घराच्या मागील आवारात दोन घोरपडी चरताना दिसल्या. अनेकदा लोक अशा प्रसंगी भीतीपोटी घोरपडींना इजा पोहोचवतात, मात्र प्रवीण बोरकर यांनी धाडस दाखवत घोरपडींना हानी न पोहोचवता काळजीपूर्वक पकडले. नंतर त्या सुरक्षितपणे जंगलात सोडून दोन्ही प्राण्यांचे प्राण वाचवले.
या संवेदनशील कृतीमुळे स्थानिक परिसरात त्यांचे कौतुक होत असून, वन्यजीव प्रेमींकडून त्यांचे मनापासून अभिनंदन करण्यात येत आहे.
वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धनासाठी समाजात अशी जाणीव वाढणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे.