पंचनाम्याचे नाटकं आणि बांधावर जाऊन नुसते फोटोशेशन नको शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी: बालाजी मोरे पाटील

पंचनाम्याचे नाटकं आणि बांधावर जाऊन नुसते फोटोशेशन नको शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी: बालाजी मोरे पाटील
वाशिम जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. सगळीकडे निसर्गाने रौद्र रूप धारण केले आहे त्यामुळे मोठी नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे. तात्काळ बचावकार्य, मूलभूत मदत करण्याची गरज आहे. जिल्हा भरातील आढावा सरकारने घेतला
मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे,जवळपास राज्यात 1 लाख 65 हजार हेक्टर पेक्षा जास्त शेती उद्धवस्त झाली आहे. नैसर्गिक आपत्ती जाहीर करून शेतकऱ्यांना 1 लाख रुपये प्रति हेक्टर मदत राज्य सरकारने जाहीर करावी. शेत मजुरांना सरसकट 50 हजार रुपये देण्यात यावेत.अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी मोरे यांनी केली
सर्व शासकीय पक्षीय कार्यक्रम रद्द करून लोकप्रतिनिधी व सरकारने राज्यभर लोकांना मदतीचे कार्य करावे.
लोकांना मदतीची गरज आहे याचं गंभीर्य सरकारने लक्षात घ्यावे!=== 24 न्यूज नेटवर्क चैनल ठाणे, वाशिम, जिल्हा प्रतिनिधी शंकर पाटील खंडारे