चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात.
उमराणे जवळ बस झाडाला धडकली 4 जण गंभीर जखमी.

उमराणे जवळ बस झाडाला धडकली 4 जण गंभीर जखमी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात
प्रतिनिधी 24 न्यूज राजेंद्र पवार नाशिक मालेगाव कडे जाणाऱ्या ऐका भरधाव बस चा मुबंई आग्रा महामार्गवरील उमराणे गावाजवळ भीषण अपघात झाला चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने रस्त्यालगतच्या झाडाला धडक दिली. त्यानंतर बस उलटली यात 4 प्रवासी गंभीर जखमी तर 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले सदर घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.बस चालक सचिन शेळके याने दुचाकी स्वराला वाचविताना अपघात घडल्याचा दावा केला.मुरबाड येथून नावी जळगाव येथे निघालेली बस ( एमएच 14 एएच 0483) मुंबई आग्रा महामार्गवरून जात असताना उमराणे जवळ सोनाई काट्याजवळ हा बुधवारी ( दि. 13) दुपारी दीड वाजता अपघात घडला अपघातात बस चालक सचिन शेळके, विशाल सराफ 43 रा. जळगाव मीनाक्षी सराफ (42 जळगाव )अर्चना पाटील (50) रुखमाबाई शेवाळे (66.रा. मुक्ताईनगर ) अथर्व अजय महाले( 3 रा. नाशिक) नींबाबाई शेवाळे (85 रा.मालेगाव ) सुभाष कापुरे (75 रा. चाळीसगाव ) हे जखमी झाले. जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र पवार नाशिक