कुर्डूवाडी नगरपालिका प्रशासनाकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटबाजी

*कुर्डूवाडी नगरपालिका प्रशासनाकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटबाजी
कुर्डूवाडी प्रतिनिधी आरती काळे
कुर्डूवाडी गटारीच्या पाण्याबाबत तक्रारी करूनही नगरपालिकेने दुर्लक्ष केले मुख्याधिकारी कार्यालयात भेटत नाहीत त्यामुळे त्रस्त झालेल्या एका नागरिकांनी समाज माध्यमाद्वारे गटार समस्येचे फोटो वायरल करून न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला यावेळी समाज माध्यमावर अनेकांनी आपली मते मांडत असताना नगरपालिकेची समस्या मांडायला सुरुवात केली आपल्या बेजाबाबदारपणाचे धिंडवडे निघत असल्याने मुख्याधिकाऱ्यांनी त्यासंबंधित ग्रुप ॲडमिनला कार्यालय बोलवून सर्व पोस्ट डिलीट करण्यास भाग पाडले या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीविषयी शहरवासीयातून संताप व्यक्त केला जात आहे भारतीय संविधानाने नागरिकांना लेखन भाषण स्वातंत्र्य अधिकार दिलेला आहे नागरिक प्रश्न बाबत वारंवार तक्रारी देऊनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे तर समाज माध्यमातून रोष व्यक्त करणे हा पर्याय ठरू शकतो मात्र कुर्डूवाडी नगरपालिका प्रशासनाने नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वतंत्र्याचा मुस्कटबाजी तंत्र अवलंबित असल्याचे दिसून येत आहे येथील भागातील गटार तुंबल्याने ते घाण पाणी एका नागरिकांच्या गेटमध्ये उलट दिशेने येते याबाबत 2023 पासून लेकी तक्रार देऊनही नगरपालिका प्रशासनाने निधी उपलब्ध नाही अशी कारणे देत याकडे काही दुर्लक्ष केले याबाबत संबंधित तक्रारदाराने 28 मार्च 2025 रोजी तत्कालीन प्रांत अधिकारी यांनाही लिखित तक्रार देत दादा मागितली मात्र पर्यंत प्रश्न सुटला नाही नाईलाजाने तक्रारदारांनी हा व्हिडिओ समाज माध्यमावर टाकला त्यामध्ये एक वृद्ध महिला हे घाण पाणी काढत असल्याचे दिसते आहे हे पाहून नागरिकांनी समाज माध्यमाद्वारे प्रशासन आणि मुख्याधिकारी यांच्यावर टीकेची झोड उठवली दोन वर्षे पाठपुरावा करूनही अशी कामे निधी अभावी होत नाही मग पाठीमागून नव्याने जी कामे होतात ती ठेकेदार जगण्यासाठी का असा प्रश्न नागरिकातून होत आहे मुख्याधिकारी केवळ एकट्यावर दबाव टाकत तू ही पोस्ट डिलीट कर नाहीतर तुझ्या वर गुन्हा दाखल करीन चल बस माझ्या गाडीवर म्हणून दम दिला त्याच्याकडून सर्व पोस्ट डिलीट करून घेतल्या मग समज माध्यमातून नागरी समस्येचे आवाज उठवणे हा काय गुन्हा आहे नागरिकांना समस्येच्या खाईत सोडून निधी नाही म्हणून समस्येचे निराकरण करण्याऐवजी पळ काढणाऱ्या वर गुन्हा दाखल झाला पाहिजे असे नागरिक बोलत आहेत शहरात अस्वच्छता नुसते नव्याने बांधलेले भिंतीवर स्वच्छ कुर्डूवाडी सुंदर कुर्डवाडी लिहून केवळ शासनाने पैसा पर्यायाने तो नागरिकांचा पैसा उडवण्याचा घाट घालणाऱ्या काय म्हणावे असे भिंतीवर लिहून शहर स्वच्छ झाले असते तर तुमची गरज काय आज शहरात अपूर्ण रस्ते अतिक्रमण मोकाट जनावरे सर्वत्र घाणीचे साम्राज्य यामुळे शहराला बकाल अवस्था आली आहे शासनाने तुम्हाला पालक म्हणून नियुक्ती केली आहे तर तुम्ही मालक म्हणून नागरिकाच्या समस्येवर गदा आणत आहात नागरिकांची मुस्कटदाबी करत आहात योग्य नाही असा सूर नागरिकांमधून निघत आहे