कॉलेज ऑफ एज्युकेशन फोर वुमेन कुर्डूवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी

कॉलेज ऑफ एज्युकेशन फोर वुमेन कुर्डूवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी
चिंचगाव प्रतिनिधी नागेश पाटील कॉलेज ऑफ एज्युकेशन फोर वुमेन अध्यापक विद्यालय कुर्डूवाडी, यांच्या संयुक्त विद्यमाने “गुरुपौर्णिमा “डॉ. म पं सुरवसे संकुलात उत्साहात साजरा करण्यात आली.या कार्यक्रमप्रसंगी श्री. तुळजाभवानी यांच्या प्रतिमेला हार घालून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी.एड विभाग प्रमुख प्रा. डॉ. लटके एम. के या होत्या. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून .साई पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. शैलजा अवचर या उपस्थित होत्या .आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून बी .एड व डी.एड च्या विद्यार्थीना “कमांडोचे ट्रेनिंग” देण्यात आले. गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व गुरुवर्यांचा विद्यार्थ्यांनी रोपे देऊन सत्कार करण्यात आला.’ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना घडविले जाते ,त्याप्रमाणे रोपाचे ही जतन केले तर चांगले फुले येतील ‘हा त्यामागचा उद्देश होता.तसेच याप्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषणे ,कविता व नृत्य करून आपला कार्यक्रमात सहभाग नोंदविला.प्रमुख पाहुणे यांनी आपल्या मनोगत यातून” गुरुचे महत्व” स्पष्ट केले. या कार्यक्रमास प्रा.डॉ. सुदर्शना दुधे , प्रा.राजश्री काळे, प्रा. रेश्मा भोंग, श्री. आशिष कांबळे.श्री. बाळासाहेब राऊत,श्री. अमित गलांडे , .साई पब्लिक स्कूल व विवेकानंद विद्यामंदिर चे सर्व शिक्षक -शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी , बी. एड विद्यार्थिनी, डी.एड विद्यार्थि उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीगणेश दाढे व रणजीत चव्हाण यांनी केले व अमोल मोरे यांनी आभार मानले.