आपला जिल्हा आपली बातमी
२४ जुलै रोजी महाराष्ट्रभर प्रहार संघटना आणि शेतकऱ्यांच्या वतीने चक्काजाम आणि रास्ता रोको आंदोलन

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ यांच्या आदेशानुसार, २४ जुलै रोजी महाराष्ट्रभर प्रहार संघटना आणि शेतकऱ्यांच्या वतीने चक्काजाम आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांगांना ₹६००० मानधन या दोन प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. प्रहार संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.