दिनांक 7/7/2025 रोजीपासून पंचायत समिती कार्यालय गेवराई जिल्हा बीड समोर आमरण उपोषण

दिनांक 7/7/2025 रोजीपासून पंचायत समिती कार्यालय गेवराई जिल्हा बीड समोर आमरण उपोषण
उपरोक्त विषयी कळविण्यात येते की महांडुळा तालुका गेवराई जिल्हा बीड येथील सरपंच असल्याकारणाने उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये माझ्या गावातील रहिवाशांनी माझ्याकडे गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी निवेदन दिले होते त्यामुळे मी गावातील सार्वजनिक विहिरीतील मोटार सुरू करण्यास गेला असता मला ज्यांची शेतामध्ये सार्वजनिक विहीर आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यास अडचण व अडथळा निर्माण केल्या व सदर शेतकऱ्यांनी सार्वजनिक विहिरीवर अतिक्रमण केलेले आहे त्या सदरच्या जे काही शेतकरी स्वतःच्या शेता करिता पाणी वापरत आहे त्यांना त्याचे कारण विचारले असता की मला आत्महत्या करण्याची धमकी देत आहेत त्यामुळे मी गटविकास अधिकारी यांना त्याची तोंडी सूचना दिली परंतु गट विकास अधिकारी यांनी सदर घटनेकडे दुर्लक्ष केले याचाच गैरफायदा घेऊन अहमद मेहबूब यांनी दिनांक 11.2.2025 रोजी माननीय तलाठी साहेब सजा हिवरवाडी तालुका गेवराई जिल्हा बीड यांच्याकडे त्यांच्या शेतात असलेल्या गट नंबर 133 मधील विहिरीची नोंद त्यांनी त्यांचे नावे इतर हक्कात लावण्याचा प्रयत्न केलेला आहे सदरची घटना माझ्या लक्षात येताच मी दिनांक 21 /3/2025 रोजी माननीय तलाठी साहेब यांच्याकडे सदरची विहीरही शेख अहमद मेहबूब यांचे नावे न करता रीतसर पणे अर्ज केला होता त्यांनी देखील सदरच्या घटनेकडे दुर्लक्ष केलेले आहे तसेच उर्वरित विहिरीवर चंद्रकांत रामभाऊ माने विठ्ठल भानुदास ढोबळे अशोक महादेव घाडगे यांनी देखील अतिक्रमण केलेले आहे सदरच्या अतिक्रमणावर गटविकास अधिकारी तलाठी अधिकारी यांनी कसल्याही प्रकारची हरकत न घेतल्यामुळे मी दिनांक 8/4/2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब कार्यकारी अधिकारी साहेब गट विकास अधिकारी साहेब माननीय तहसीलदार साहेब व मुख्य कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद बीड उपविभाग गेवराई यांच्याकडे देखील लेखी अर्ज केला होता सदर अर्जावर कोणीही कसल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई न करता सदरचे अतिक्रमण नियमितपणे अद्याप पर्यंत सुरू आहे त्यामुळे मी दिनांक 8 /4/2025 रोजी पुन्हा वरील सर्व अधिकाऱ्यांना लेखी अर्ज दिला होता तरीसुद्धा त्यांनी माझ्या तक्रारी अर्जावर कसल्याही प्रकारची दखल न घेता मला व माझ्या गावकऱ्यांना पाणीटंचाईपासून मुक्त केलेली नाही त्यामुळे मी शेवटी दिनांक 17/ 6 /2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय बीड तालुका जिल्हा बीड वरील सर्व अधिकाऱ्यांना परत पुन्हा लेखी अर्ज देऊन सदरचे अतिक्रमण हे पंधरा दिवसाच्या आत मध्ये काढण्यात यावे तसेच आमचे गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत जे काही कामे मंजूर झालेले आहेत अत्यंत निकृष्ट पद्धतीने केलेल्या असून सदरच्या कामाची चौकशी केली असता कंत्राट दाराने सदरचे काम पूर्णतः टप्प्य केलेले आहे त्यामुळे मी पंचायत समिती कार्यालय गेवराई येथे उपोषणास बसेल असे कळविले होते तरीसुद्धा माननीय जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकार्यालय बीड तालुका जिल्हा बीड यांनी देखील माझ्या तक्रारी अर्जाची कसलीही दखल न घेतल्यामुळे मी शेवटी नाई ला जास्तव मला बीपीचा त्रास असून देखील दिनांक 7/7/2025 रोजी पंचायत समिती कार्यालय गेवराई तालुका गेवराई जिल्हा बीड समोर आमरण उपोषणास बसत आहे तरी माननीय साहेबांनी याची दखल घेण्याची कृपा करावी…
जिल्हा प्रतिनिधी…..
एस.जी.त्रिभुवन
जाहिरात व बातमीसाठी संपर्क साधा 73 50 50 10 61.