शिवनी रसुलापूरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेशोस्तव

शिवनी रसुलापूरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेशोस्तव
नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सव्वालाखे
शाळेच्या पहिल्या दिवशी सोमवारी 23 जून रोजी आपल्या विभागाच्या शाळा सुरू झाल्या. शाळेत मुलांच्या स्वागतासाठी जयत तयारी करण्यात आली. या वर्गाच्या मुलांना शाळेची गोडी लागावी आणि भीती वाटून नये म्हणून पहिल्या दिवशी त्यांना सजवून ढोल ताशाच्या गजरात प्रभात फेरी काढण्यात आली. आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामेश्वर मारबदे सरपंच सौ सत्यकला खडसे उपसरपंच मधुकर कोठाळे गणेश कांबळे पुरुषोत्तम बनसोड तसेच प्रमुख पाहुणे म्हणून तेजश्री कोरे उपविभागीय अधिकारी चांदुर रेल्वे, प्रसाद संकपाळ गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर, विलास बाबरे शिक्षण विस्तार अधिकारी, अविनाश आढाव केंद्र प्रमुख, तसेच शाळेचे मुख्याध्यापीका नीलिमा जुवार, भावराव राठोड, नीलिमा मानकर, रमेश शिंदे, राजीव डांगे, विजय नेमाडे, कुमदिनी कावरे, संगीता गजरे, आरती वंजारी इत्यादी उपस्थित होते.