आपला जिल्हा आपली बातमी

प्राथमिक विद्यामंदिर व माध्यमिक विद्यालय दुधाळे येथे नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी झालेत शैक्षणिक रथाचे सारथी

प्राथमिक विद्यामंदिर व माध्यमिक विद्यालय दुधाळे येथे नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी झालेत शैक्षणिक रथाचे सारथी

शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा विकास संस्था वाघाळे संचलित प्राथमिक विद्यामंदिर व माध्यमिक विद्यालय दुधाळे येथे नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी झालेत शैक्षणिक रथाचे सारथी

 

गेल्या दीड – दोन महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर नवीन शैक्षणिक वर्षात आजपासून शाळा सुरू होत आहेत शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय दिवस व्हावा म्हणून प्राथमिक व माध्यमिक विद्यालय दुधाळे येथे शाळेच्या पहिल्या दिवशी आकर्षक बैलगाडीचा रथ सजवत विद्यार्थ्यांना बसवून ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत प्रवेशद्वारापर्यंत आणून नवागत विद्यार्थ्यांचे पायांचे ठसे घेऊन गुलाब पुष्प देत आणि केक कापून मोठ्या आनंदी व उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले आमच्या शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा विकास संस्था वाघाळे संचलित प्राथमिक विद्यामंदिर व माध्यमिक विद्यालय दुधाळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवागतांचे स्वागत व प्रवेशोत्सव समारंभप्रसंगी नंदुरबार जिल्ह्याच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना वळवी यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.

 

 ते म्हणाले शाळेने पहिल्या दिवशी केलेले विद्यार्थ्यांचे स्वागत हे विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय असे आहे असेच नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये शाळेची गोडी व आवड उत्साह निर्माण होईल यासाठी व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील राहावे अशी सदिच्छा व्यक्त केली व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

 

कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित संस्थाध्यक्ष आदरणीय अशोक रामदासजी अहिरे साहेब यांनी आपल्या भाषणातून कार्यक्रमाचे कौतुक करत नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आज दिवशी कार्यक्रमाला उपस्थित लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या संस्था सदस्या श्रीमती ताईसाहेब माधुरी अशोक अहिरे व केंद्र विस्तार अधिकारी बागले मॅडम केंद्रप्रमुख बागुल साहेब तसेच गावाचे प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच अश्विनीताई मालचे दुधाळे गावाचे ग्राम विकास अधिकारी आप्पासाहेब दौलत जी कोकणी साहेब .उपसरपंच सत्य प्रकाश मालचे .ग्रामपंचायत सदस्य कृष्णा दादा पवार व पंचक्रोशी पालक वर्ग यांची उपस्थिती लाभली

शाळेचे श्री. प्राथमिक उपशिक्षक वसावे सर यांनी प्रास्ताविक सादर करत आजच्या कार्यक्रमाची संकल्पना व नवीन शैक्षणिक वर्षातील रूपरेषा मान्यवर व विद्यार्थ्यांसमोर सादर केली.

प्रतिनिधी हर्षल बोरसे नंदुरबार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button