आपला जिल्हा आपली बातमी

मेडशी आरोग्य केंद्राच्या समोर फलक लावण्याची गरज संबंधित अधिकाऱ्याचे दुर्लक्ष

मेडशी आरोग्य केंद्राच्या समोर फलक लावण्याची गरज संबंधित अधिकाऱ्याचे दुर्लक्ष .

मालेगाव – प्रतिनिधी प्रफुल साठे दिनांक 05 जून 2025 रोजी वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र समोर फलक लावण्याची गरज आहे. हे केवळ स्थानिक ओळख नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेच्या सध्याच्या स्थितीचे प्रतीक आहे.

 या पार्श्वभूमीवर फलक लावणे अत्यंत आवश्यक आहे. फलक लावल्याने बाहेरील रुग्णांना आरोग्य केंद्र सेवा हे दिसण्यास सुलभ होईल व आरोग्य केंद्राच्या कार्यक्षमतेत वाढ होईल. अनेक वर्षापासून फलकच नाही आपत्कालीन परिस्थितीत ग्रामीण रुग्णालय शोधण्यास नाहक त्रास सहन करावा लागतो. सार्वजनिक रुग्णालयासमोर ओळख दर्शवणारा फलक नसल्याने बाहेरगावावरून येणारे पहिल्यांदाच रुग्णांची रस्ता शोधण्याचा अडचण येते. यामध्ये नवीन रुग्ण, गर्भवती महिला, वयोवृद्ध, गावातील नागरिक, यांना केंद्र शोधण्यात वेळ जातो, तसेच एमर्जेंसी मध्ये पेशंट असल्यास शोधण्यास त्रास सहन करावा लागतो. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असले तरी केंद्राच्या मुख्यभागी कोणताही ओळखीचा दर्शक फलक लावलेला नाही त्यामुळे केंद्र नेमके कुठे आहे? हे शोधणे अवघड जात आहे

 

24 News Network

ताज्या बातम्या घडामोडी बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 9022978588

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button