करमाळा उपनिबंधक कार्यालयाचा ढिसाळ कारभार…जनता आणि संस्थात्मक कामे वाऱ्यावर
अतुल खूपसे पाटील आंदोलनाच्या पवित्र्यात

करमाळा उपनिबंधक कार्यालयाचा ढिसाळ कारभार…जनता आणि संस्थात्मक कामे वाऱ्यावर
अतुल खूपसे पाटील आंदोलनाच्या पवित्र्यात
चिंचगाव प्रतिनिधी नागेश पाटील
सहाय्यक निबंधक करमाळा कार्यालय आणि लोकांच्या कामाचा खोळंबा हे जणू सूत्र च गेल्या काही दिवसांपासून चालु असल्याचं दिसतंय. साहेबांना दुसरीकडे अतिरिक्त चार्ज असल्याचं उत्तर देऊन गेल्या 3 महिन्यापासून गावोगावी आणि तालुक्यातून आलेल्या लोकांना वारंवार तारीख पे तारीख चा अनुभव घ्यावा लागत आहे.अशी माहिती यावेळी बोलताना अतुल खूपसे पाटील यांनी यावेळी दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये कोर्टात चालू असलेल्या केसेस, वेगवेगळ्या गावांतील संस्थेच्या परवानग्या,संबंधित संस्थांच्या तक्रारी, शिक्षक सहकारी पतसंस्था, सहकारी पतसंस्था यांच्या प्रशासनिक अडचणींचा पाढा चालू असताना निबंधक कार्यालय मात्र झोपेत असल्याचं दिसून येत आहे. विविध ठिकाणी तक्रार आलेली असताना त्या ठिकाणी प्रत्यक्ष अधिकारी न पाठवता, दप्तराची चौकशी न करता, न पाहता उडवा उडवी ची उत्तरे देण्याचं काम याठिकाणी चालू आहे.आणि प्रत्यक्ष त्या संस्थांवर ची कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा चौकशी करण्यात आलेली नाही. लोकांना उत्तरामध्ये अतिरिक्त चार्ज मुळे साहेब नाहीत, उद्या, परवा, चार दिवसांनी या अशी उत्तरे मिळत असून त्यामुळे सामान्य लोकांचा खोळंबा आणि मनस्ताप होत असून प्रशासन खरोखर च लोकांसाठी आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
त्यामुळे अतिरिक्त चार्ज चे कारण सांगून सदरील अधिकारी आणि प्रशासन सामान्य लोकांची अडवणूक करणार असेल तर जनशक्ती शेतकरी संघटना गप्प बसणार नाही आणि प्रशासनाला वठणीवर आणेल असे ही त्यांनी बोलताना यावेळी सांगितले.
लोकांची, संस्थांची कामे मार्गी लागावी आणि प्रशासन जलदगतीने कार्यरत व्हावे यासाठी लवकरात लवकर करमाळा तालुक्याला पूर्ण वेळ साहाय्यक निबंधक अधिकारी मिळावेत अशी मागणी अतुल खूपसे पाटील यांनी केली. या मागणी ची दखल घेतली गेली नाही तर प्रसंगी आंदोलनाच्या माध्यमातून सरकार ला धारेवर धरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.