आपला जिल्हा आपली बातमी

घरेलू कामगार दिन अमरावतीत उत्साहात साजरा — हक्क, आरोग्य व कायदेविषयक मार्गदर्शनाचा उपक्रम

 

घरेलू कामगार दिन अमरावतीत उत्साहात साजरा — हक्क, आरोग्य व कायदेविषयक मार्गदर्शनाचा उपक्रम

अमरावती, दि. १६ जून — श्रमसाफल्य घरेलू कामगार संघटनेच्या वतीने जागतिक घरेलू कामगार दिनाचे औचित्य साधून अमरावतीतील राहुल नगर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा दिवस उत्साहात साजरा करताना महिलांच्या हक्क, आरोग्य व कायदेविषयक मुद्द्यांवर मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शीतल वाघमारे यांनी उपस्थित महिलांना केंद्र व राज्य सरकारकडून घरेलू कामगारांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी लवकरात लवकर होण्यासाठी महिलांनी संघटित राहून प्रशासन व सरकारकडे आग्रह धरण्याचे आवाहन केले.

नीलिमा भटकर यांनी महिलांना कायदेविषयक अधिकारांची माहिती दिली. घरकाम करताना अनेकदा महिलांना आपले हक्क आणि कायदे माहित नसतात, त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याबाबत सविस्तर मार्गदर्शन करत त्यांनी महिलांना कायद्याचे ज्ञान घेण्याचे आणि अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले.

प्रिती मून (समुपदेशक, जिल्हा स्त्री रुग्णालय, अमरावती) यांनी घरकाम करताना होणाऱ्या आरोग्याच्या समस्या आणि त्यावर उपाययोजना याविषयी उपयुक्त माहिती दिली. सततच्या मेहनतीतून उद्भवणारे आरोग्य प्रश्न व त्याचे परिणाम टाळण्यासाठी नियमित तपासणी आणि योग्य आरोग्य सल्ल्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमास भाग्यश्री खडेकार (अध्यक्ष, श्रमसाफल्य घरेलू कामगार संघटना),हर्षा सगणे (अध्यक्ष क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन), जोशना वानखडे, शुभांगी वरघट, ईश्वरी तायवाडे, सुजाता तायडे, राणी बनोदे, पल्लवी खंडारे, सुनिता धाकडे, छाया टेंभुर्णे, गीता धरमपल्ली व संघटनेच्या इतर पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व वक्त्यांचे आणि महिलांचे आभार मानण्यात आले. महिला कामगारांच्या हक्कासाठी अशीच एकजूट व जागरूकता आवश्यक असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.

प्रति मा. संपादक वरील वृत्त प्रकाशित करावे ही विनंती!! आपला आशिष देशमुख अमरावती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button