अमरावती शहर

भावी डॉक्टरचा अपघातात थिरुअनंतपूरम मध्ये मृत्यू:पार्थिव आज येणार अमरावतीत; आईसह तिघे जखमी‎

भावी डॉक्टरचा अपघातात थिरुअनंतपूरम मध्ये मृत्यू:पार्थिव आज येणार अमरावतीत; आईसह तिघे जखमी‎
अमरावती – (प्रतिनिधी प्रीती साहू) वैद्यकीय क्षेत्रात आपले भविष्य घडवण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरुणावर काळाने झडप घातली. केरळमधील एम. व्ही. आर. मेडिकल कॉलेज, कन्नूर येथे एमबीबीएससाठी प्रवेश निश्चित करून अमरावतीच्या दिशेने परत येत असताना थिरुअनंतपूरम जवळ शुक्रवारी (दि.२७) पहाटे ५ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यश नाईक (वय १९) असे मृताचे नाव आहेसंजय गांधी नगर अमरावती येथील रवींद्र नाईक आणि मनीषा नाईक यांचा यश हा एकुलता एक मुलगा होता. वैद्यकीय प्रवेश घेण्यासाठी तो केरळला गेला होता. स्वप्नांच्या दिशेने पहिले पाऊल टाकून तो परत येत असताना, शुक्रवारी थिरुअनंतपूरम जवळ त्यांच्या एमएच २७ डीएल ६७१६ या चारचाकी वाहनाचा अपघात झाला. यात यशचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्याच्यासोबत असलेले मामा संदीप सुभाष जामनिक आणि मावशा संदीप रामदास भटकर (दोघेही रा. दर्यापूर ) गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर बंगळुरू येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यशच्या आईची मनीषा नाईक यांची तब्येत सुदैवाने स्थिर आहे. यशचा मृतदेह थिरुअनंतपूरम येथून अमरावतीकडे रवाना झाला असून, त्याची अंत्ययात्रा रविवार, २९ जूनला सकाळी ११ वाजता संजय गांधी नगरातील निवासस्थानावरून निघणार आहे. लहानपणापासून डॉक्टर होऊन समाजाची सेवा करण्याचे त्याचे स्वप्न पूर्णत्वास येत होते. सामान्य परिस्थितीत यशने जिद्द आणि ध्येय कायम ठेवत एमबीबीएसला प्रवेश निश्चित केला होता. डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्णत्वास येत असताना अचानक या भावी डॉक्टरवर काळाने घाला घातला. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button