भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या आंदोलनाला यश पारखेड अत्याचार प्रकरणातील आरोपी अटकेत
मौजे पारखेड तालुका खामगाव येथील मातंग आरोपींना तडीपार करण्या केले आंदोलन .

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या आंदोलनाला यश पारखेड अत्याचार प्रकरणातील आरोपी अटकेत.
मौजे पारखेड तालुका खामगाव येथील मातंग समाजावर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात दिनांक ०९/०६/२५ रोजी खामगाव येथील एस डी ओ तथा अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव यांचे कार्यालयावर भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा खामगाव जिल्ह्याचे वतीने आरोपींना अटक करण्यासाठी व तडीपार करण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक २२/०६/२५ रोजी फरार असलेल्या आरोपी ज्ञानेश्वर लाहुडकार, गजानन लाऊडकर, व परमेश्वर लाडू कार यांना पोलिसांनी आज मोठ्या सिताफिने अटक केली. सदर आंदोलन भाजपा अनुसूचित जाती मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष व राष्ट्रीय लहूशक्तीचे अध्यक्ष श्री परिमलदादा कांबळे व भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री सुनील भाऊ तांदळे तसेच भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा महामंत्री विजय पारेकर, मातंग समाजाचे युवा नेते महेंद्र वानखडे, संतोष बोरकर, मनीष बोरकर, जुगल जी सिसोदिया, संतोष शेगोकार अशोकराव बोदडे, व भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा तथा सकल मातंग समाजाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते या आंदोलनाची दखल घेऊन आज फरार असलेले आरोपी यांना अटक करण्यात आली.