21 जून 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा
{दरवर्षी संत वामन महाराज इंग्लिश स्कुल मध्ये निशुल्क योग प्रशिक्षणाचे आयोजन

21 जून 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा
{दरवर्षी संत वामन महाराज इंग्लिश स्कुल मध्ये निशुल्क योग प्रशिक्षणाचे आयोजन
}
मानोरा:- भारताने जगाला योगाची ओळख करून दिली आणि जगभरात योगाचा प्रसार केला. योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळाली आहे. जगभरातील लोकांना योगाचे महत्व पटवून देण्यासाठी आणि योगाप्रती लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी २१ जून हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा केला जातो
आंतरराष्ट्रीय योग दिन हा योगास मान्यता देणारा दिवस आहे. जो 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने स्वीकारल्यानंतर दरवर्षी 21 जून रोजी जगभरात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्या अनुषंगाने मानोरा येथील प्रतिष्ठित संत वामन महाराज इंग्लिश स्कुल & ज्युनियर कॉलेज धामणी मानोरा येथे ११ वां आंतरराष्ट्रीय योग दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
एल.एस.पी.एम हायस्कूल धामणी मानोराचे अध्यक्ष श्री व्हि.भी.पाटील उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून मानोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री प्रवीण शिंदे, भारतीय जनता पार्टी मानोरा तालुका अध्यक्ष श्री अरविंदभाऊ इंगोले, पतंजली योग समिती मानोरा श्री जीवन भाऊ भोयर, माजी वैद्यकीय अधिकारी, भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते तथा शाळेचे संचालक डॉ.श्री सुहासजी देशमुख, मेष्ठा संघटना विदर्भ अध्यक्ष तथा शाळेचे संचालक श्री अभिजीत देशमुख, पतंजली योग समिती मानोरा महिला प्रभारी तथा शाळेच्या योग शिक्षिका सौं.अर्चना राऊत, शाळेच्या मुख्याध्यापिका सौं.सोनाली राऊत(पिंगळे), शाळेचे कार्यालय प्रमुख श्री नितीन चगदळ, शाळेचे सर्व शिक्षक वृंद, शाळेचे विद्यार्थी तथा पालक, परिसरातील योगसाधक ११ वा.आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योग मुळात एक अध्यात्मिक शिस्त आहे जी अत्यंत सूक्ष्म विज्ञानावर आधारित आहे. ज्या शक्तीमुळ मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद आणण्यावर लक्ष केंद्रित करते. हे एक शास्त्र आहे. निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगण्याची कला आहे. ‘योग’ हा शब्द ‘युज’ या संस्कृत शब्दापासून बनला आहे, जो ‘जोडणे’ किंवा ‘एकत्रित होणे’ असा अर्थ आहे. सर्वांनी योगाचे महत्त्व जाणून घेऊन नियमित योगाभ्यास करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे शरीर व मन निरोगी राहून प्रसन्न वातावरण आपल्या आजूबाजूला तयार होते. आपल्या जीवनात योगाचे अन्य साधारण महत्त्व आहे. ह्याचे महत्व योग साधकांनी जाणून घ्यायला हवे. असे प्रतिपादन माजी वैद्यकीय अधिकारी, भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते तथा शाळेचे संचालक डॉ.श्री सुहासजी देशमुख यांनी योग दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.
योग दिन २०२५ ची थीम ‘एक पृथ्वी-एक आरोग्यासाठी योग’ आहे. ही थीम पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी योगास प्रोत्साहन व भर देण्यावर आधारित आहे. या थीमचा उद्देश वयक्तिक आणि जागतिक आरोग्यामधील संबंध अधोरेखित करणे आहे. यासोबतच पर्यावरण संतुलन आणि शाश्वत विकासात योगाची भूमिका देखील अधोरेखित करायची आहे. शारीरिक आणि आध्यात्मिक विकासासाठी योगाचे महत्व विचारात घेऊन प्रतिवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन दिनांक २१ जून रोजी साजरा करण्यात येतो. सयुंक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस “आंतरराष्ट्रीय योग दिन” म्हणून घोषित केला आहे. यानुसार प्रतिवर्षी २१ जून हा दिवस राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याबाबत सविस्तर माहिती www.ayush.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे प्रतिपादन पतंजली योग समिती मानोरा महिला प्रभारी तथा शाळेच्या योग शिक्षिका सौं.अर्चना राऊत ह्यांनी संत वामन महाराज इंग्रजी शाळेत आयोजित ११ वा. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंधेला संबोधित करतांना मनोगत व्यक्त केले. उपस्थित पाहुणे मंडळींचे तथा मान्यवरांचे, योग साधकांचे आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका सौं. सोनाली पिंगळे(राऊत) यांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.