वाशिम जिल्हा विशेष

वाशिम ची मिताली काबरा राज्यात टॉपर

वाशिम ची मिताली काबरा राज्यात टॉपर !

 

वाशिम : प्रतिनिधी विकास लगड तालुक्यातील तोंडगाव येथील मनीष काबरा यांची मुलगी मिताली हिने इयत्ता बारावी परीक्षेत ६०० पैकी ५९४ (९९%) गुण प्राप्त केले आहेत. इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालात मिताली ही राज्यात टॉपर असल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. 

मिताली ही तोरणाळा (जिल्हा वाशिम) येथील ममता इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी आहे.

 

मिताली शिल्पा मनिष काबरा हिला विज्ञान शाखेत ९९ टक्के (५९४/६००) गुण मिळाले असून तिने जेईई मेन्स मध्ये ९९.५८ पर्सेंटाइल प्राप्त केले आहे. दहावीमध्ये तिने आयसीएसई बोर्डातून ९८.६० टक्के गुण मिळवले होते. मितालीचे वडील मनीष हे मूळ तोंडगाव (वाशिम) येथील असून ते सध्या छत्रपती संभाजीनगर येथे चार्टर्ड अकाउंटंट आहेत . मिताली हिची आई संगणक अभियांत्रिकीमध्ये पीएच.डी. केली आहे. त्या सुद्धा छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

मितालीला पुढील शिक्षण मॅप अँड कॉम्प्युटिंग या क्षेत्रात करिअर करायचे आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई वडील आणि आजोबा राजेश लढ्ढा सह कुटुंबियाना दिले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button