परभणीतील पाथरीत स्थागुशाने पकडला सोळा लाखाचा गुटखा
एकूण २० लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…

परभणीतील पाथरीत स्थागुशाने पकडला सोळा लाखाचा गुटखा
एकूण २० लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…!
पाथरीच्या ढालेगाव येथे कारवाई
परभणी/पाथरी (Pathari Crime) : स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सोमवार ७ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास पाथरी ते माजलगाव रोडवर ढालेगाव येथे केलेल्या कारवाईत १५ लाख ९२ हजार रुपयांचा गुटखा, एक चारचाकी वाहन आणि मोबाईल मिळून २० लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एकूण तीन आरोपींवर पाथरी पोलिसात (Pathari Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकूण २० लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…!
पाथरीच्या ढालेगाव येथे कारवाई
सोनपेठात १ लाख १० हजाराचा गुटखा जप्त
स्थागुशाचे पो.नि. विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. गोपीनाथ वाघमारे, पोलिस अंमलदार विलास सातपुते, विष्णु चव्हाण, सिध्देश्वर चाटे, गजानन क्षीरसागर, मधुकर ढवळे, नामदेव डुबे, संजय घुगे यांच्या पथकाने कारवाई केली. पोलिसांचे पथक अवैध धंद्याची माहिती काढत गस्त घालत होते. या पथकाला चारचाकी वाहनामधुन अवैधरित्या गुटखा आणला जात असल्याची माहिती मिळाली. (Pathari Crime) सदर माहितीवरुन पोलिसांनी कारवाई करत एम.एच. २८ – बी.बी. ५४३८ या क्रमांकाचे वाहन थांबविले. सदर वाहनात १५ लाख ९२ हजार रुपयांचा गुटखा होता. या प्रकरणी पो.ह. विलास सातपुते यांच्या फिर्यादीवरुन परवेज खान व इतर दोन अशा एकूण तीन जणांवर पाथरी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोउपनि. कुलकर्णी करत आहेत.
सोनपेठात १ लाख १० हजाराचा गुटखा जप्त
सोनपेठ : स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सोनपेठ पोलिस ठाणे हद्दीत नरवाडी शिवारात रविवार ६ एप्रिल रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास कारवाई करत १ लाख १० हजार ३७० रुपयांचा गुटखा पकडला आहे. या (Pathari Crime) प्रकरणी रामराव नरवाडे, सोनु बाराखुदे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अंमलदार परसोडे, कांगणे, सावंत, परसराम गायकवाड, दिलीप निलपत्रेवार, वावधने, जगताप यांच्या पथकाने केली.