मातंग समाजावरील अन्याय अत्याचार तात्काळ थांबवा … संजय वैरागड.

मातंग समाजावरील अन्याय अत्याचार तात्काळ थांबवा … संजय वैरागड.
वाशिम: मातंग समाजावर होत असलेला अन्याय अत्याचार थांबविण्याकरिता जिल्हाधिकारी वाशिम यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखिल भारतीय मातंग संघ राज्य कार्याध्यक्ष संजय वैरागड यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील मातंग समाज प्रामाणिक व शांततेच्या मार्गाने जीवन जगणारा आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मातंग समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय त्याच्यावर होत आलेला आहे. त्यामुळे समाजाचा राजकीय आर्थिक सामाजिक विकास झाला नाही व मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहे. असे असताना रोजच अन्य अत्याचाराच्या घटना घडत आहे. जिल्हा परभणी तालुका सोनपेठ मधील शेळगाव येथील रामेश्वर उफाडे १७ वर्षाचा अकरावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या मुलाला जातीयवादी भावनेतून तू मांग आहेस तुला शिकण्याची काय गरज आहे तू मंदिरासमोर ढोलकी वाजव, फडे विन,डफडे वाजव अशी कामे कर असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्याने लाकडी दंडकाने बेदम मारहाण केली फायटरने मारहाण केल्यामुळे नाक फ्रॅक्चर झालेला आहे, या बातमीची शाही सुकन्या आधीच पुणे येथील मातंग समाजाची तनिषा भिसे हिला दीनानाथ मंगेशकर चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल असून तिथे डिपॉझिट न भरण्याचे कारण पुढे करून गरोदर महिलेचे उपचार न केल्यामुळे तिला जीव गमवावा लागला ह्या दोन्ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर असून अशा नराधमावर कठोर कारवाई झाली पाहिजे वरील दोन्ही घटनेतील आरोपी यांच्याविरुद्ध कठोर शासनाने कार्यवाही करावी अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय मातंग संघ राज्य कार्याध्यक्ष संजय वैरागड यांनी दिनांक ८ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी वाशिम यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. यावेळी संजय वैरागड राज्य कार्याध्यक्ष अखिल भारतीय मातंग संघ, विदर्भ अध्यक्ष माणिकराव बांगर, जिल्हाध्यक्ष आर के पाटोळे, युवा जिल्हाध्यक्ष संतोष आवारे, वाशिम तालुका अध्यक्ष सिताराम डोंगरे,शहराध्यक्ष नाथा डोंगरे आदींची उपस्थिती होती.