आपला जिल्हा आपली बातमी

माजी आमदार संजय शिदेंना आदिनाथमध्ये संधी

माजी आमदार संजय शिदेंना आदिनाथमध्ये संधी

चिंचगाव प्रतिनिधी नागेश पाटील

कारखाना सुरू करण्याचा घेतला निर्धार टीकेला जशास तसे उत्तर विरोधकांच्या पायाखालीची वाळू सरकली नवीन चेहरा असल्याची चर्चा आदिनाथ सहकारी साखर कारखाना हे शेतकऱ्यांचे मंदिर म्हणून ओळखले जाते या कारखान्यात शेतकरी व कामगारांच्या भावना आहेत मात्र हा कारखाना अडचणीत आहे या कारखान्यासाठी गुरुवारी दिनांक 17 रोजी मतदान आहे निवडणूक प्रचारात प्रत्येक गटाकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला आहे जोरदार सभा ही झाल्या आहेत त्यात आरोप प्रत्यारोप झाले दोन्ही गटाकडून जशास तसे उत्तर देण्यात आले विशेष म्हणजे या निवडणुकीत माजी आमदार संजय शिंदे प्रचंड आक्रमक झाले असल्याचे चित्र दिसते त्यांच्या भाषणाची चर्चाही झाली सुरुवातीपासून त्यांनी अपवाद वगळता टीका टिपणी टाळत कारखाना सुरू कसा करणार याची तांत्रिक माहिती देण्यावर भर ठेवला विधानसभा निवडणुकीनंतर करमाळ्यात श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पाटील गट व शिंदे गट समोरासमोर आले या निवडणुकीत तीन पॅनल असले तरी आमदार नारायण आबा पाटील माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्याच पॅनलची जोरदार चर्चा चालू आहे जामखेड तालुक्यातील बारा गावातील दोन्ही गटाकडून प्रचार झाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेटे याहूनही प्राध्यापक रामदास झोळ हे मात्र यावेळी प्रचारात मागे पडले आदिनाथ मध्ये योगदान असलेले दशरथ कांबळे हे प्रचारात कोठेही दिसले नाहीत विधानसभेच्या निवडणुकीत संजय मामा शिंदे यांचा नारायण आबा पाटील यांनी पराभव केला होता त्यानंतर ही निवडणूक होत आहे विधानसभा निवडणुकीत पाटील यांच्याबरोबर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार होते मात्र आदिनाथच्या निवडणुकीत त्यांचा फोटो शिंदे यांच्या पॅनल वर दिसला त्यांचे विश्वासू मानले जाणारे सुभाष गुळवे हे उघडपणे शिंदे यांच्याबरोबर होते त्यामुळे जामखेड तालुक्यातील बारा गावांमध्ये शिंदेंना चांगला फायदा होऊ शकतो विधानसभा निवडणुकीत बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे हे आमदार पाटील यांच्याबरोबर होते मात्र या निवडणुकीत ते माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्याबरोबर होते त्यांच्या भागातील संपूर्ण यंत्रणा त्यांनी शिंदे यांच्या पाठीशी उभा केली आहे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यांचा फायदा शिंदे पॅनलला होऊ शकतो आदिनाथ कारखाना अडचणीत आहे त्याला बाहेर काढणे आवश्यक आहे तालुक्यातील अस्मिता म्हणून या कारखान्याची ओळख असली तरी या कारखान्यात कायम राजकारण झाले आहे शिंदे यांच्याकडे हा कारखाना एकदाही गेलेला नव्हता त्यामुळे ते ह्या कारखान्याला अडचणीतून बाहेर काढतील अशी शक्यता आहे त्यांच्या अनुभवाचा फायदा कारखान्याला होईल त्यामुळे नवीन चेहरा म्हणत आमदार संजय मामा शिंदे यांना ह्या नवीन चेहऱ्याला एकदा संधी देऊ असे लोकातून बोलले जाते श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या बॅनरवर संजय मामा शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे फोटो वापरले याशिवाय निवडणूक प्रचार दरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांची भेट घेऊन श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला मदत करण्याचे आवाहन केले त्यात पवार यांनीही मदत करण्याचे सांगितले त्यांचाही फायदा होऊ शकतो आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून जगताप व बागल गटाने माघार घेतली आहे त्यांनी उघडपणे कोणालाही पाठिंबा दिला नाही त्यामुळे आमदार पाटील यांच्या विरोधकातील मते शिंदे पॅनलला जाऊ शकतात त्याचाही फायदा शिंदे पॅनला होऊ शकतो

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button