आपला जिल्हा आपली बातमी

कर्तुत्ववान व्यक्तीचा सन्मान पुरस्कार सोहळा उत्साहात साजरा

कर्तुत्ववान व्यक्तीचा सन्मान पुरस्कार सोहळा उत्साहात साजरा

कर्तुत्ववान व्यक्तीचा सन्मान पुरस्कार सोहळा उत्साहात साजरा

चिंचगाव प्रतिनिधी अभिजीत पाटील 

शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्यासाठी मानाचा पुरस्कार म्हणून देण्यात आला.

केम येथील अबॅकस संचालिका व शिक्षिका, सौ.सोनल गौरव कुलकर्णी , यांना शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना अबॅकस शिक्षण पद्धतीला विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासोबतच, त्यांच्या शैक्षणिक विकासातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी प्रदान करण्यात आला.

सौ सोनल गौरव कुलकर्णी यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांना अबॅकसचे प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी केवळ गणितीय कौशल्येच नव्हे, तर एकाग्रता, स्मरणशक्ती आणि तार्किक क्षमता यांसारख्या महत्त्वाच्या क्षमतांमध्येही उल्लेखनीय प्रगती केली आहे.

          सौ.सोनल कुलकर्णी यांच्या या कार्यामुळे केवळ विद्यार्थीच नव्हे, तर पालक आणि शिक्षण क्षेत्रातही आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या योगदानाला मिळालेला हा पुरस्कार निश्चितच इतरांनाही प्रेरणा देणारा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button